Lokmat Agro >हवामान > राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Orange alert in these districts for the next two days in the state; Heavy rains likely | राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रोजीचे रात्री ८.३० पर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात ११७.८ मी.मी. पाऊस झाला. या पावसामुळे मौजे हदगाव नखाते, येथील सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यात घराच्या छतावर अडकले असता आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे.

राज्यातील या भागात ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा: सामायिक शेतजमिनीची वाटणी करता येते का? काय आहे नियम? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Orange alert in these districts for the next two days in the state; Heavy rains likely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.