Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट

आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट

Now you will get flood information with one click; This website is launching soon | आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट

आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट

संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले.

संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले.

सांगली : महापालिकेने नागरिकांसाठी संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले.

राज्यात प्रथमच अशा प्रकारचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे, असा दावा कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केला आहे. महापुराच्या तयारीसंबंधी सांगलीत शुक्रवारी कृष्णा महापूर नियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्जेराव पाटील व दिवाण बोलत होते.

सर्जेराव पाटील म्हणाले, महापुराबाबत विविध अभ्यासकांनी सुचवलेल्या उपाययोजना समोर ठेवून संकेतस्थळ विकसित केले आहे. प्रामुख्याने (सीडब्ल्यूसी) केंद्रीय जल आयोग यांची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये समाविष्ट केली आहेत.

कृष्णा नदीची पाणीपातळी आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती संकेतस्थळावर प्रत्येक तासाला देण्यात येणार आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी कमी-जास्त झाल्यास संबंधित विभागाला याच्या माध्यमातून नोटिसा देण्याची व्यवस्था केली आहे.

जिल्ह्यात पडणारा पाऊस आणि धरणाच्या कार्यक्षेत्रातील पावसाची माहिती असणार आहे. धरणातील पाण्याची पातळी, वाहून जाणारे पाणी, इतर नद्यांतून वाहणारे पाणी, पुढे पडणारा पाऊस अशा सर्वांचा अभ्यास करून हे संकेतस्थळ विकसित केले आहे. नागरिकांना ताजी माहिती तात्काळ मिळणार आहे.

संकेतस्थळाचे काम ८० टक्के पूर्ण
सातत्याने येणारे महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी एकात्मिक परिचलन होण्यासाठी आणि त्याचे नियंत्रण करण्यासाठी वेब प्रणाली विकसित करण्याची सूचना होती. त्यानुसार कृष्णा खोरे नावाचे संकेतस्थळ विकसित करण्यात येणार आहे. या संकेतस्थळाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

अधिक वाचा: यंदा पावसाळ्यात या दिवशी समुद्राला सर्वांत मोठी भरती येणार

Web Title: Now you will get flood information with one click; This website is launching soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.