Join us

Maharashtra Weather Update: राज्यात उकाड्याला सुरूवात; वाचा IMD चा सविस्तर रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:17 IST

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. सतत तापामानात चढ-उतार होताना दिसत आहे. जाणून घेऊयात राज्यात आज कसे असेल तापमान सविस्तर.

जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच किमान तापमानात घसरण होता आहे तर कुठे तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील थंडीसाठी तयार झालेले पोषक वातावरण बदलणार असून महाराष्ट्रात येत्या ४८ तासात किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश राजस्थान पंजाब या भागात दोन दिवस कडाक्याच्या थंडीसह प्रचंड गारठा जाणवणार आहे. (Cold Temperature) तर दक्षिणेत तमिळनाडू, केरळ भागात पावसाला पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात कमाल तापमानातही २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमान फारसे बदलणार नाही. त्यानंतर त्यात बदल होतील, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

तर विदर्भात येत्या ३ दिवसात कमाल व किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे, असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (IMD weather alert)

शेतकऱ्यांना सल्ला

* करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : सकाळच्या गारव्यानंतर दुपारी उन्हाचा चटका वाचा IMD चा अलर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडाशेतकरी