Join us

Maharashtra Weather Update: राज्यात परत एकदा अवकाळीचे संकट; कसे असेल आज हवामान वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:22 IST

Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे उष्णतेचा कहर सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परत एकदा अवकळीचे संकट राज्यात घोंगावताना दिसत आहे. येत्या ४८ तासांमध्ये हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. वाचा IMD चा हवामान अंदाज सविस्तर (Unseasonal weather)

Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे उष्णतेचा कहर सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परत एकदा अवकळीचे संकट राज्यात घोंगावताना दिसत आहे.  येत्या ४८ तासांमध्ये  हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत.  (Unseasonal weather)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पर्वतीय भागांमधील हवामानात अनेक बदल झाले असताना दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळेही राज्यातील हवामानावर परिणाम होतना दिसत आहे. 

उत्तर पश्चिम भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असेल, तर पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये वादळी वारेसुद्धा वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Unseasonal weather)

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पारा चांगलाच वाढला असून, राज्याच्या ब्रह्मपुरी भागामध्ये पारा सर्वाधिक ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकताना दिसला.  राज्यातील इतर जिल्ह्यातही वेगळे चित्र पाहायला मिळाले नाही. तर, तिथे कोकणात दमट हवामानामुळे उष्मा अधिक जाणवत होता.

येत्या ४८ तासांमध्ये हवामानात मोठे बदल होणार असून, पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. पुढील ३ दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  (Unseasonal weather)

विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पुढचे ५ दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. काही जिल्ह्यात गारपीटीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. (Unseasonal weather)

राज्याच्या लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर या भागांना अवकाळीचा तडाखा अपेक्षित असून, इथे गारपिटीचाही इशारा जारी करण्यात आला आहे. तर, अकोला भागात उष्णतेची लाट मात्र कायम असेल. (Unseasonal weather)

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगलीपासून सिंधुदुर्गापर्यंत पावसाळी ढग पाहायला मिळतील. तर, काही भागांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावेल. (Unseasonal weather)

होरपळीपासून दिलासा

राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेने शेतकऱ्यांसह नागरिकांची होरपळ होताना दिसत आहे.  तर आज काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला गारपीट होईल, असा अंदाज हवामाना विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे होरपळीतून दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रपाऊसकोकणविदर्भमराठवाडा