Join us

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळीचे पुन्हा संकट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 09:20 IST

Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानात सातत्याने बदल होत असून, काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४१°C च्या पुढे गेला आहे, तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळीचे संकट निवळणार असे वाटत असतानाच परत एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.

राज्यात हवामानात सातत्याने बदल होत असून, काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४१°C च्या पुढे गेला आहे, तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन आहे. राज्यात सध्या अवकाळीचे ढग पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडतोय. तर कुठे उष्णतेचा पारा वाढतोय.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा काही भागांमध्ये देण्यात आलाय. मात्र, विदर्भात सातत्याने उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान हे ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पहायला मिळात आहे. पश्चिम महाराष्ट्रातसांगलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कमी हवामानाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत मोठी वाढ झालीये. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्हांमध्ये तापमान हे ४१ अंशापर्यंत पोहोचले होते. यवतमाळ, परभणी, भंडारा, गडचिरोली, वाशिम याठिकाणी तापमान ४० अंशावर पोहोचले. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. (Unseasonal Rain)

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पुण्यात तापमान वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २१°C च्या जवळपास असेल, असेही हवामान विभागाने कळविले आहे. (Unseasonal Rain)

शेतकऱ्यांना सल्ला

* येत्या पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: कुठे तापमान वाढ तर कुठे अवकाळीचा मारा; काय आहे आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणसांगलीमराठवाडाविदर्भ