Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार

Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार

Maharashtra Weather Update: There will be more rain in the state from 'this' date next week | Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार

Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार

Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या अंदाजानुसार, २४ ते ३१ जुलैदरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पावसाची शक्यता सामान्यपेक्षा जास्त आहे.

३१ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

दरम्यान, मंगळवारचा पाऊस वगळता मुंबईकडे मान्सूनने पाठ फिरवली आहे. कुठे तरी तुरळक सर वगळता दिवस कोरडा जात आहे.

त्यात मुंबईसह राज्यात उकाड्याचे प्रमाण कमालीची वाढल्याने पावसाळ्यातही घामाघूम होताना दिसत आहेत. खरीप पिकांनाही पाण्याचा ताण पडतो आहे सद्यस्थितीत पावसाची आवश्यता आहे.

अधिक वाचा: ७५ वर्षाची आजी 'ह्या' योजनेतून झाली २७ गुंठे सातबाराची मालकीण; वाचा सविस्तर

Web Title: Maharashtra Weather Update: There will be more rain in the state from 'this' date next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.