मुंबई : उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत.
या बदलानुसार १७, १८ व १९ मार्च रोजी मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता आहे. मुंबईसह राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाले आहे.
नंदुरबारचे कमाल तापमान ४१.५ अंश नोंदविण्यात आले आहे. शनिवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण वातावरण राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशीव, भंडारा, गडचिरोली, गोंदियात विजांचा कडकडाट होण्याचाही शक्यता वर्तवली आहे.
अधिक वाचा: तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी
