Join us

Maharashtra Weather Update : पश्चिम हिमालयात चक्रावात सक्रीय; काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:43 IST

Maharashtra Weather Update: पश्चिमी चक्रावातामुळे येत्या ४ दिवसात राज्यातील हवामानावर काय होईल परिणाम ते वाचा सविस्तर

पश्चिम हिमालयाच्या (Western Himalaya) भागात दोन वेगवेगळ्या प्रकारचे पश्चिमी चक्रावात (Western Cyclone) तयार झाले असून येत्या चार दिवसात उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला (Rain)  पोषक असे वातावरण तयार झाले आहे.

दक्षिणेकडेही नैऋत्य मोसमी (Southwest Season) पावसाचा जोर कायम असून दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून तापमानात येत्या पाच दिवसात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.

येत्या २४ तासांत राज्यातील किमान तापमान २-३ अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणामी राज्यात उकाडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

गारठा ओसरला, तापमानात वाढ

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. आता दक्षिण व उत्तरेकडील राज्यांमधील हवामानाच्या प्रभावाने राज्यातील हवामानात बदल होत आहेत.

राज्यात बहुतांश ठिकाणी पहाटे किमान तापमान घट झाली असली तरी गारठा कमी झालाय. उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे नोंदवले गेले.

राज्यातील किमान तापमान

अहिल्यानगर १२.९, छत्रपती संभाजीनगर १६.१, बीड १७, हिंगोली ११.८, जालना १७.५, लातूर १९.८, नंदुरबार २०.१, पालघर २१.३, पुणे १३ ते १७.९, रत्नागिरी १९.२, सोलापूर १८.८, मुंबई सांताक्रुज २१.८ असे किमान तापमान नोंदविण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

* जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उकाड्याला सुरूवात; वाचा IMD चा सविस्तर रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमहाराष्ट्रकोकणमराठवाडाविदर्भ