Maharashtra Weather Update : राज्यात सध्या प्रत्येक जिल्ह्यात वेग वेगळे हवामान पाहायला मिळत आहे. कुठे तापमानात वाढ होत आहे तर कुठे अवकाळीच्या सरी बरसत आहेत.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावाताच्या धर्तीवर देशाभरात येत्या काही दिवसात हवामानात बदल होईल. उत्तरेकडील राज्यांना हिमवृष्टीचा तडाखा बसणार असून, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा आणि नजीकच्या भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुन्हा अवकाळीचा इशारा
राज्याच्या विदर्भात तापमानाचा आकडा मोठ्या फरकाने वाढत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे एकिकडे उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात अवकाळीचा मारा नागरिकांनसह शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.