Maharashtra weather Update : राज्यातील मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. (today's weather)
राज्यात एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसले. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. (today's weather)
राज्यात अवकाळीचे ढग पसरले आहे. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून तूर्तास तरी सुटका झाली आहे. पावसामुळे हवेत गारवा जाणवत आहे. (today's weather)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात लगतच्या अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अलर्ट जरी केला आहे. (today's weather)
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. विदर्भासह अनेक भागात या पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याचे पाहायला मिळाले.
या भागात अलर्ट
राज्यातील विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.