Maharashtra Weather News : राज्यात एप्रिल महिन्यात संमिश्र हवामान पाहायला मिळाले. कुठे अवकाळीचा मारा, गारपीट झाली तर कुठे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले. येत्या २४ तासांमध्ये हवामान कसे असेल याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.(cyclonic winds)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांसह पश्चिम बंगालमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असतानाच विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये मात्र तापमानात अनपेक्षित घट नोंदविण्यात आली आहे. (cyclonic winds)
पूर्व विदर्भात येत्या २४ तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून, येथे सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (cyclonic winds)
तापमानात होतेय घट
सध्या राजस्थानच्या नैऋत्येपासून नजीकच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची (cyclonic winds) निर्मिती होत आहे. त्याचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याच पश्चिम विदर्भ आणि कर्नाटक ते केरळदरम्यानच्या कमी दाबाच्या पट्ट्याचीही भर पडत आहे. यामुळे महाराष्ट्रात मागील २४ तासात तापमानात घट नोंदविण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हवेत गारवा
राज्याच्या कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांसह पालघरपर्यंत तापमानात घट नोंदविण्यात आली असून, पहाटेच्या वेळी अभाळ पाहायला मिळाले. या भागांमध्ये फक्त पहाटेच्या वेळी अंशत: गारवा पसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. .
दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची हजेरी असेल, असा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तामपानात घट होत असली तरीही परभणी, अकोला, वाशिम, ब्रह्मपुरी या भागांमध्ये पारा ४१ ते ४२ अंशांदरम्यानच आहे. तर, बुलढाण्यात तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदिवण्यात आले.
या भागात पावसाचा इशारा
पुणे, नांदेड, लातूर,धाराशिव, सोलापूर,सांगली कोल्हापूरातही आज हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाचा वेग लक्षात घेता पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.