Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळीचे ढग निवळल्यावर आता उष्णतेचा पारा (Heat wave) वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने वर्तविला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या अंतर्गत भागात असणाऱ्या परिसरावरून चक्राकार वारे वाहत असून, मराठवाडा आणि तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंत अजुनही कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. (Heat wave)
त्यातच बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे या कमी दाबाच्या पट्ट्याला मिळत असल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. (Heat wave)
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यात धुमाकुळ घातला होता. त्यामुळे वाढतेच्या उष्णतेपासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. परंतु आता उष्णतेच्या पाऱ्यात वाढ होताना दिसत आहे.
राज्यात विदर्भ आणि कोकण भागामध्ये पुन्हा तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकण भागात दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Heat wave)
दक्षिणेकडे भागात हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडूनही उष्ण वारे राज्याच्या दिशेनं येण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे.
त्यामुळे राज्याच्या जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धासह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत पारा चाळीशीपार पोहोचला आहे.
पुढील २ ते ३ दिवसांत राज्यातील कमाल तापमानामध्ये २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी.
* काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : NABARD: 'हवामान सुसंगत शेती'साठी १४ गावांत विशेष प्रकल्प वाचा सविस्तर