Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. (humidity weather)
येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्यामध्ये मध्य भारतात, लगतच्या पूर्व, तसेच वायव्य भारतात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (humidity weather)
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत मुंबईमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे अधिक उष्णता जाणवेल. या महिन्यात उत्तर कोकण, विदर्भ, तसेच मराठवाड्याचा काही भाग येथे उष्णतेच्या लाटा सरासरीपेक्षा अधिक जाणवतील. (humidity weather)
गुरुवारी आर्द्रतेत वाढ
राज्यात मुंबईमध्ये गुरुवारी तापमान ३५ अंशांच्या आत असतानाही असह्य उकाड्याने मुंबईकर हैराण झाले. कुलाबा येथे ३४.१ तर सांताक्रूझ येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ०.५ आणि ०.४ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे ७० टक्क्यांहून अधिक, तर सांताक्रूझ येथे ६५ टक्क्यांच्या जवळपास आर्द्रता होती. यामुळे उष्णता अधिक जाणवत आहे.
आर्द्रता वाढण्यामागे काय आहे कारण?
* आग्नेय राजस्थानजवळ चक्रीय वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय राजस्थानपासून उत्तर केरळपर्यंत उत्तर-दक्षिण डांची द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रतेत वाढ झाली आहे.
* राज्यावर याचा परिणाम होताना दिसत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाडा, विदर्भामध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ४०-६० किमी प्रतितास वेगाने गारपीट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. राज्यभरात सतत हवामानात कधी अवकाळी, तर कधी तापमानाच्या पारा ४० अंशाच्यावर पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
सध्या तापमान चांगलेच वाढले असून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
* उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.