Join us

Maharashtra Weather Update: पुढील ५ दिवस राज्यात कुठे जोरदार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 14:08 IST

राज्यामध्ये काही भागांत जोरदार पाऊस होत असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

पुणे : राज्यामध्ये काही भागांत जोरदार पाऊस होत असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

शनिवारी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला असून, घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून कोकण आणि पश्चिम घाट परिसरात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्या आणि धरणे दुथडी भरून वाहत असून येणाऱ्या काही दिवसात पिकांच्या वाढीसाठी पावसामध्ये काही दिवसांचा खंड असणे आवश्यक आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये राज्यात सर्वात कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

कुठे आहे कुठला अलर्ट?रेड अलर्ट: पुणे, सातारा घाट माथा.यलो अलर्ट : मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड.ऑरेंज अलर्ट : विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत दिला आहे.

टॅग्स :हवामानपाऊसमहाराष्ट्रपुणेसाताराविदर्भ