Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागांत थंडीचाcold जोर कमी झाला आहे तर काही भागांत गारठा कायम आहे. विदर्भाच्याहवामानातweather बदल होताना दिसत आहे. ढगाळ हवामानासह काही ठिकाणी अवकाळी पाऊसrain पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भात ऐन थंडीच्या मोसमात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या ३ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहिती नुसार, राज्यात थंडीच्या मोसमात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. राज्यातील विविध भागात थंडीचा जोर ओसरला असून मागील २ दिवसांत ढगाळ हवामान आहे. सोमवारी(२३ डिसेंबर) रोजी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येत्या २ दिवसात ढगाळ हवामान राहणार असून २६ आणि २७ डिसेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबईत असे असेल हवामान
२४ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून वातावरणात धुके राहणार आहे. मुंबईतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस एवढे राहील. मुंबईतील किमान तापमानामध्ये जराशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून थंडी देखील कमी झाली आहे.
पुण्यातील हवामान
पुणे शहरामध्ये येत्या २४ तासांत सामान्यतः आकाश ढगाळ राहणार असून काही प्रमाणात धुके देखील राहणार आहे. पुण्यातील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे राहील. ढगाळ आकाशासह पुण्यात थंडी जाणवेल.
मराठवाड्यातील हवामान
मराठवाड्यामध्ये काहीसे आकाश ढगाळ तसेच हलकी थंडी जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर मधील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आकाश ढगाळ राहणार असून थंडी जाणवणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील हवामान
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र आकाश निरभ्र होण्यास सुरुवात होईल. मंगळवारी नाशिकमधील कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस एवढे राहील.
उपराजधानी नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील. नागपूरमधील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे राहील. एकंदरीत राज्यामधील थंडीचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर २६ आणि २७ डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांश शहरांमध्ये हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या २ दिवसात राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान राहील.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.