Maharshtra Weather Update : दक्षिण पश्चिम समुद्र किनाऱ्यावर, दक्षिण पूर्व सागरात आणि पश्चिम बंगालच्या खाडीत(Bay of Bangal) तीन ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशनची(cyclonic circulation) स्थिती निर्माण झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या जवळ चक्रीवादळासारखी(Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अति धुके आणि हाडं गोठवणारी थंडी(cold) तर दुसरीकडे पाऊस आणि ढगाळ हवामान(Coludy Weather) अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात पावसाचा अलर्ट
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा २ ते ४ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा किमान तापमानात ३-५ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणात येत्या ४८ तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहील.
मराठवाड्यात काय स्थिती?
मराठवाड्यासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे आहेत. ११, १२,१३ जानेवारी रोजी तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर किमान तापमान हे परभणीमध्ये सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी जिल्ह्यात किमान तापमान ७- ८ अंश सेल्सिअस खाली घसरले आहे. तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तपमान नोंदविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. आता कुठे आंबा काजूचा मोहर चांगला आला म्हणता म्हणता पावसामुळे तो काळा पडण्याची, गळून पडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : बाहेर जाताय! छत्री स्वेटर सोबत ठेवा; IMD रिपार्ट वाचा सविस्तर