Join us

Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यांत पारा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 09:29 IST

Maharashtra Cold Wave महाराष्ट्रात कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी नोंदविण्यात आले आहे.

Maharashtra Weather update : महाराष्ट्रातील तापमानात Weather सातत्याने बदल change होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात किंचित बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, थंडीcold कायम राहणार आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २४ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार आहे. मात्र, त्यानंतर २५ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत राज्यातील तापमान वाढ होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल. राज्यात परभणी, निफाड, अहिल्यानगर आणि नांदेडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद शुक्रवारी(२० डिसेंबर) रोजी करण्यात आली.

'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली

महाराष्ट्रात धुळे, परभणी, निफाड, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर गोंदिया, भंडारा आणि वर्धा या ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली नोंदविण्यात आले.वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात पावसाची शक्यता

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज (२१ डिसेंबर) रोजी राज्यातील जवळपास चार ते पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात २१ डिसेंबर ते २६ डिसेंबरदरम्यान पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

बदललेल्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.  थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळ्या जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.हे ही वाचा सविस्तर : Uttarayan : काय सांगताय! दिवस अवघ्या पावणेअकरा तासांचा अन् रात्र सव्वातेरा तासांची वाचा सविस्तर वृत्त

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसचक्रीवादळकोकणमराठवाडाविदर्भमहाराष्ट्र