Lokmat Agro >हवामान > Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचं 'सुकं येरझार'; शेतकरी उघड्या आभाळाखाली वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचं 'सुकं येरझार'; शेतकरी उघड्या आभाळाखाली वाचा सविस्तर

latest news Vidarbha Weather Update : Rains 'dry up' in Vidarbha; Farmers are working under the open sky Read more | Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचं 'सुकं येरझार'; शेतकरी उघड्या आभाळाखाली वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचं 'सुकं येरझार'; शेतकरी उघड्या आभाळाखाली वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी संकटात सरकारकडून तातडीच्या उपाययोजनेची अपेक्षा वाढली आहे. (Vidarbha Weather Update)

Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी संकटात सरकारकडून तातडीच्या उपाययोजनेची अपेक्षा वाढली आहे. (Vidarbha Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Vidarbha Weather Update :  राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. (Vidarbha Weather Update)

पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी संकटात सरकारकडून तातडीच्या उपाययोजनेची अपेक्षा वाढली आहे. राज्यात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्याचा मोठा भाग पावसाच्या प्रतीक्षेत कोरडा पडलेला आहे. (Vidarbha Weather Update)

कोकण, पुणे आणि नाशिक विभागात समाधानकारक पाऊस झाला असताना नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात केवळ १०० मिमीच्याही खाली पावसाची नोंद झाली आहे.(Vidarbha Weather Update)

खरीप हंगाम रखडला, पेरण्या थांबल्या

* विदर्भ व मराठवाड्यात मुख्यतः सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांची लागवड होते.

* मात्र, पावसाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या असून जमिनी नांगरून ठेवलेल्या आहेत.

*  यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड चिंतेचं वातावरण आहे.

विभागनिहाय जून अखेर पावसाची स्थिती (२३ जूनपर्यंत)

विभाग / जिल्हापावसाचं प्रमाण (मिमी)सरासरीच्या टक्केवारीत
कोकण५२३.९१०३.२ %
पुणे१६३.९१०७.६ %
नाशिक१०५.९१००.५ %
अमरावती५७.४५०.७ %
संभाजीनगर४५.७४१.० %
नागपूर४०.०२७.९ %

अमरावती जिल्ह्यातील पावसाची स्थिती (२३ जूनपर्यंत)

तालुकापावसाचं प्रमाण (मिमी)
मोर्शी३४.१
धारणी३५.८
भातकुली४०.०
धामणगाव५२.०
दर्यापूर६१.२
नांदगाव खंडेश्वर५५.०
तिवसा६२.६
चांदूर बाजार७०.४
अमरावती तालुका७७.६

शेतकऱ्यांचे संकट : अंकुर फुटून कीड फस्त करतेय

* अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पेरली, पण पावसाअभावी अंकुर फुटल्यानंतर 'वाणी' या किडीने नुकसान केले आहे.

* विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे तातडीने बियाणे, सल्ला व उपाययोजनांची मागणी केली आहे.

* शेतकरी विशिष्ट वाण मागत असले तरी जिल्हा कृषी विभागाने 'उत्पादन सारखं आहे, कोणताही वाण घ्या' असा सल्ला दिला आहे.

शुभवार्ता : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे संकेत

* उत्तर बंगालच्या उपसागरात नवीन चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात पावसाचे पुनरागमन अपेक्षित.

* भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भासाठी पाच दिवसांचा 'यलो अलर्ट' दिला आहे.

* अमरावती, नागपूर परिसरात मंगळवारपासून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज.

विदर्भात जून महिन्यात अपेक्षित पावसाचा मोठा अभाव असल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आता हवामान खात्याच्या अलर्टनंतर शेतकरी पुन्हा आशेने पुढे येत आहेत. सरकारकडून तत्काळ मदत, बियाण्यांचा पुरवठा आणि किड नियंत्रण उपाययोजना हाच पुढचा मार्ग आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा रेड सिग्नल वाचा सविस्तर

Web Title: latest news Vidarbha Weather Update : Rains 'dry up' in Vidarbha; Farmers are working under the open sky Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.