Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणाची पातळी घसरली; उन्हाळ्यात पाणी मिळणार का?

Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणाची पातळी घसरली; उन्हाळ्यात पाणी मिळणार का?

latest news Upper Wardha Dam Water Level: Upper Wardha Dam level has dropped; Will water be available in summer? | Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणाची पातळी घसरली; उन्हाळ्यात पाणी मिळणार का?

Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणाची पातळी घसरली; उन्हाळ्यात पाणी मिळणार का?

Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणातील पाणी पातळी सतत घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अमरावतीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Upper Wardha Dam Water Level)

Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणातील पाणी पातळी सतत घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अमरावतीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Upper Wardha Dam Water Level)

मोर्शी : पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे आणि अमरावती जिल्ह्यासाठी जीवनदायिनी मानले जाणारे अपर वर्धा धरण येथील पाणी साठा दिवसेंदिवस घटत असल्याने आगामी काळात जलटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.(Upper Wardha Dam Water Level)

पाणीपातळीत सातत्याने घट

सध्या धरणातील जलाशयाची पातळी ५४.६२ टक्क्यांवर आली असून ती हळूहळू कमी होत आहे. मागील वर्षी याच काळात ही पातळी ५२.६६ टक्के होती.

धरणाची सध्याची पाणीपातळी ३३२ मीटर इतकी नोंदवली गेली आहे, जी निर्धारित ३४२.५० मीटरच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढली

मोर्शी तालुक्यासह परिसरात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, जलसाठ्यावर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे.

मागील वर्षी भरले होते ९० टक्के

गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण सुमारे ९० टक्क्यांपर्यंत भरले होते. त्यावेळी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलसाठ्यात घट होत आहे.

पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

अपर वर्धा धरणातून मोर्शी, वरुड, अमरावती शहर, औद्योगिक क्षेत्रे (एमआयडीसी) तसेच हिवरखेड, लोणी, राजुरा यांसारख्या गावांना पाणीपुरवठा केला जातो.

साठा कमी होत असल्याने या भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची भीती आहे. सिंचनासाठी पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

जलसंकटाचे सावट

सध्याच्या स्थितीवरून येत्या उन्हाळ्यात जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे, नियोजनबद्ध वितरण करणे आणि पावसाळ्यापर्यंत उपलब्ध साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरणार आहे.

अपर वर्धा धरणातील घटता पाणी साठा लक्षात घेता, संपूर्ण अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट गडद होत असून सर्व स्तरांवर पाणी बचतीची गरज अधोरेखित होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dam Water Level : अमरावतीत पाण्यासाठी संघर्ष; मराठवाड्यात धरणं तुडुंब- कारण काय?

अधिक वाचा : Gaalmukt Dharan Gaalyukt Shivar 2.0 : धरणातून निघाला खजिना; 'या' योजनेने शेतं झाली सोन्यासारखी सुपीक

Web Title : अपर वर्धा बांध का जल स्तर गिरा: क्या गर्मी में पानी मिलेगा?

Web Summary : अपर वर्धा बांध में जल स्तर घटने से अमरावती में गर्मी के दौरान पानी की कमी की चिंता बढ़ गई है। कम वर्षा के कारण जल भंडार प्रभावित हुआ है, जिससे कई क्षेत्रों में पेयजल और सिंचाई जल आपूर्ति प्रभावित हो सकती है।

Web Title : Upper Wardha Dam Level Drops: Will There Be Water in Summer?

Web Summary : Water levels in Upper Wardha Dam are decreasing, raising concerns about water scarcity in Amravati during summer. Reduced rainfall has impacted reserves, potentially affecting drinking and irrigation water supply to several areas.