Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Siddheshwar Dam Water Release : सिद्धेश्वर धरण उघडले; सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Siddheshwar Dam Water Release : सिद्धेश्वर धरण उघडले; सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

latest news Siddheshwar Dam Water Release: Siddheshwar Dam opened; Irrigation and drinking water problem will be solved | Siddheshwar Dam Water Release : सिद्धेश्वर धरण उघडले; सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Siddheshwar Dam Water Release : सिद्धेश्वर धरण उघडले; सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Siddheshwar Dam Water Release : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून २१८२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असला, तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Siddheshwar Dam Water Release)

Siddheshwar Dam Water Release : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून २१८२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असला, तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Siddheshwar Dam Water Release)

Siddheshwar Dam Water Release : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पूर्णा प्रकल्पांतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.(Siddheshwar Dam Water Release) 

सिद्धेश्वर धरणाचे चार वक्रद्वार उघडण्यात आले असून, नदीपात्रात २,१८२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(Siddheshwar Dam Water Release) 

या निर्णयामुळे हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चार दरवाजे उघडले; विसर्ग सुरू

मंगळवारी दुपारी २ वाजता गेट क्रमांक ३, ८, ९ आणि ११ हे दरवाजे प्रत्येकी ०.३० मीटरने उघडण्यात आले. सध्या सुमारे ६१.७९ घनमीटर प्रति सेकंद इतका पाण्याचा प्रवाह पूर्णा नदीपात्रात सोडला जात आहे. 

धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

येलदरीतून तिसरे आवर्तन; १५ मेगावॅट वीजनिर्मिती

येलदरी धरणातून पिण्यासाठी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे तिसरे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. २४ एप्रिलपासून जलविद्युत केंद्राच्या दोन संचांमधून दररोज पाणी सोडले जात असून, यामुळे १५ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. परिणामी वीजपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

या निर्णयामुळे हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सुमारे ५७,९८८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. 

भुईमूग, ऊस, केळी आणि हळद या पिकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच परभणी, पूर्णा, वसमत, जिंतूर या शहरांसह २५० हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

गतवर्षी येलदरी धरण १०० टक्के भरले असल्यामुळे यंदा पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. मात्र, भविष्यातील टंचाई लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. 

ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

सिद्धेश्वर धरणातून सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळाला असला, तरी पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करणे हीच भविष्यासाठी शाश्वत उपाययोजना ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Heatwave Alert : उष्णतेचा कहर वाढतोय; अन् सरकार म्हणते उष्णतेची लाट 'आपत्ती' नाही?

अधिक वाचा : Gas New Rules Update : १ मेपासून गॅस मिळवणं सोपं नाही; 'हे' नवे नियम जाणून घ्या

Web Title : सिद्धेश्वर बांध खुला: सिंचाई और पीने के पानी की समस्या का समाधान

Web Summary : सिद्धेश्वर बांध के गेट खोले गए, जिससे नदी में पानी छोड़ा गया। इससे हिंगोली, परभणी और नांदेड़ जिलों को लाभ होगा, 57,988 हेक्टेयर भूमि की सिंचाई होगी। परभणी और अन्य शहरों के लिए पीने के पानी की जरूरतें पूरी होंगी। नागरिकों से पानी का बुद्धिमानी से उपयोग करने का आग्रह किया गया है। येल्डरी बांध 15 मेगावाट बिजली पैदा करता है।

Web Title : Siddheshwar Dam Opens: Irrigation and Drinking Water Issues Resolved

Web Summary : Siddheshwar Dam's gates opened, releasing water into the river. This benefits Hingoli, Parbhani, and Nanded districts, irrigating 57,988 hectares. It addresses drinking water needs for Parbhani and other towns. Citizens are urged to use water judiciously. Yeldari dam generates 15 MW electricity.