Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Painganga River Barrage Project : मोठी खुशखबर! पैनगंगा बारमाही वाहणार; हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली

Painganga River Barrage Project : मोठी खुशखबर! पैनगंगा बारमाही वाहणार; हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली

latest news Painganga River Barrage Project: Big good news! Painganga will flow all year round; Thousands of hectares of agriculture under irrigation | Painganga River Barrage Project : मोठी खुशखबर! पैनगंगा बारमाही वाहणार; हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली

Painganga River Barrage Project : मोठी खुशखबर! पैनगंगा बारमाही वाहणार; हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली

Painganga River Barrage Project : किनवट आणि माहूर तालुक्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना प्रत्यक्षात उतरत असून पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरिजेसमुळे आता नदी बारमाही वाहणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ११,३७० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून, पाण्याची समस्या दूर होऊन परिसरात हरितक्रांतीची नवी आशा निर्माण झाली आहे.(Painganga River Barrage Project)

Painganga River Barrage Project : किनवट आणि माहूर तालुक्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना प्रत्यक्षात उतरत असून पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरिजेसमुळे आता नदी बारमाही वाहणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ११,३७० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून, पाण्याची समस्या दूर होऊन परिसरात हरितक्रांतीची नवी आशा निर्माण झाली आहे.(Painganga River Barrage Project)

Painganga River Barrage Project : नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाकांक्षी योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे.(Painganga River Barrage Project)

पैनगंगा नदी (Painganga River) या नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरिजेसच्या मालिकेमुळे नदी केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर बारमाही वाहती राहणार आहे.(Painganga River Barrage Project)

या प्रकल्पांमुळे सुमारे ११,३७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून परिसरात हरितक्रांतीची नवी आशा निर्माण झाली आहे.(Painganga River Barrage Project)

बॅरिजेसचे 'अष्टक' आकाराला

या नदीवर यापूर्वीच चार उच्च पातळी बंधारे पूर्ण झाले असून सध्या आणखी तीन बॅरिजेसचे काम वेगात सुरू आहे. याशिवाय मारेगाव (खालचे) बॅरेजला मंजुरी मिळाल्याने एकूण आठ प्रकल्पांची साखळी पूर्ण होणार आहे.

हे 'अष्टक' पूर्ण झाल्यानंतर पैनगंगा नदीत वर्षभर पाणी उपलब्ध राहणार आहे.

११,३७० हेक्टर शेतीलापाणी

या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षमता वाढणार आहे.

संभाव्य सिंचन क्षेत्र पुढीलप्रमाणे

मोहपूर : १,४५० हेक्टर

येंदा : १,३०० हेक्टर

साकुर : १,४५० हेक्टर

दिगडी (कुत्तेमार) : १,६०० हेक्टर

किनवट : १,५७० हेक्टर

उनकेश्वर : १,४५० हेक्टर

मारेगाव (खालचे) : १,४५० हेक्टर

धनोडा : १,१०० हेक्टर

एकूण मिळून ११,३७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

किनवट-माहूरचा होणार कायापालट

उन्हाळ्यात कोरडी पडणारी पैनगंगा नदी आता बाराही महिने पाण्याने भरलेली राहणार असल्याने

शेतीसाठी नियमित पाण्याचा पुरवठा

पिकांची उत्पादनक्षमता वाढ

भूजल पातळीत वाढ

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता

अशा अनेक सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर तालुक्यांनाही फायदा

या प्रकल्पाचा लाभ केवळ किनवट आणि माहूरपुरता मर्यादित राहणार नाही. विदर्भातील उमरखेड आणि महागाव तालुक्यांतील गावांनाही सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.

खासदार अशोकराव चव्हाण यांचे मिळाले सहकार्य

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीप नाईक यांनी रखडलेल्या कामांसाठी जोरदार पाठपुरावा केला. ज्याला तत्कालीन खासदार व आताचे आमदार हेमंत पाटील यांची साथ मिळाली होती. 

मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली. आमदार हेमंत पाटील आणि किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी पाठपुरावा करून रेंगाळलेल्या उनकेश्वर आणि किनवट बॅरिजेसच्या कामाला मंजुरी मिळवून दिली.

याकामी खासदार अशोकराव चव्हाण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. पैनगंगा नदीवरील आठही प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर किनवट आणि माहूर तालुक्यांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.

हरितक्रांतीची नवी आशा

पैनगंगा नदीवरील सर्व बॅरिजेस पूर्ण झाल्यानंतर या भागात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन हिरवळ निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दीर्घकाळापासून पाण्याच्या समस्येला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.

पैनगंगा नदीवरील बॅरिजेसचे अष्टक पूर्णत्वास गेल्यानंतर किनवट-माहूरसह परिसरातील शेती, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे. हा प्रकल्प भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी आदर्श ठरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!

अधिक वाचा : Agriculture Planning Tips : शेतकऱ्यांनो, संकटे आहेतच; 'या' पद्धतीने करा शेतीचं प्लॅनिंग

Web Title : पैगंगा नदी बैराज परियोजना से हजारों हेक्टेयर भूमि की सिंचाई होगी

Web Summary : पैगंगा नदी बैराज परियोजना जल्द ही पूरी होने वाली है, जिससे किनवट और माहूर में 11,370 हेक्टेयर भूमि की सिंचाई होगी और साल भर पानी का प्रवाह बना रहेगा। आठ बैराज कृषि को बढ़ावा देंगे, भूजल स्तर बढ़ाएंगे और पीने के पानी की समस्याओं को हल करेंगे, जिससे आसपास के जिलों को लाभ होगा और हरित क्रांति आएगी।

Web Title : Painganga River Barrage Project to Irrigate Thousands of Hectares

Web Summary : The Painganga River Barrage project nears completion, promising year-round water flow and irrigating 11,370 hectares in Kinwat and Mahur. Eight barrages will boost agriculture, raise groundwater levels, and potentially solve drinking water issues, benefiting nearby districts and heralding a green revolution.