Lokmat Agro >हवामान > Nimna Terna Project : मे महिन्यातच पाण्याची कृपा; निम्न तेरणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ वाचा सविस्तर

Nimna Terna Project : मे महिन्यातच पाण्याची कृपा; निम्न तेरणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ वाचा सविस्तर

latest news Nimna Terna Project: Grace of water in May itself; Increase in storage of Nimna Terna Project Read in detail | Nimna Terna Project : मे महिन्यातच पाण्याची कृपा; निम्न तेरणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ वाचा सविस्तर

Nimna Terna Project : मे महिन्यातच पाण्याची कृपा; निम्न तेरणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ वाचा सविस्तर

Nimna Terna Project : मे महिन्यात अवकाळी पावसाने लोहारा तालुक्यात दमदार हजेरी लावत अनेक भागांतील नद्या, नाले भरून वाहू लागले. याच पावसाचा सकारात्मक परिणाम माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्यावर दिसून आला असून, पाणीसाठ्यात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Nimna Terna Project)

Nimna Terna Project : मे महिन्यात अवकाळी पावसाने लोहारा तालुक्यात दमदार हजेरी लावत अनेक भागांतील नद्या, नाले भरून वाहू लागले. याच पावसाचा सकारात्मक परिणाम माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्यावर दिसून आला असून, पाणीसाठ्यात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Nimna Terna Project)

शेअर :

Join us
Join usNext

बालाजी बिराजदार

 मे महिन्यात अवकाळी पावसाने लोहारा तालुक्यात दमदार हजेरी लावत अनेक भागांतील नद्या, नाले भरून वाहू लागले. याच पावसाचा सकारात्मक परिणाम माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्यावर दिसून आला असून, पाणीसाठ्यात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.(Nimna Terna Project) 

निसर्गाने दिलेला हा अनपेक्षित पावसाची कृपा लोहारा तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. पाणीसाठ्यातील ही वाढ भविष्यातील गरजांसाठी उपयोगी पडणार असून, स्थानिक प्रशासनाने साठ्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनावर भर देण्याची गरजेचे आहे. (Nimna Terna Project) 

लोहारा, उमरगा, औसा, निलंगा भागाला होणार लाभ

या जलसाठ्यामुळे लोहारा तालुक्यासह उमरगा, औसा, निलंगा तालुक्यांतील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, शेतीसाठी आवश्यक सिंचन आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळणार आहे. स्थानिक प्रशासनाने या साठ्याच्या योग्य व्यवस्थापनावर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

उन्हाळ्यातील अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सध्या अनेक प्रकल्प आणि तलाव कोरडे असतानाच निम्न तेरणा प्रकल्पात वाढ झाल्याने हा एक सकारात्मक संकेत मानला जात आहे.

पावसामुळे २०.६१६ दलघमी पाण्याची आवक

मे महिन्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्पात २०.६१६ दलघमी इतकी पाण्याची आवक नोंदवण्यात आली. ही आवक प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या सुमारे २२ टक्के इतकी आहे. यामुळे उन्हाळ्याच्या शेवटीच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रकल्पाच्या जलसाठ्याची आकडेवारी (३० मे २०२५ रोजी)

एकूण साठवण क्षमता: ८६.०५० दलघमी

उपयुक्त साठा: ५६.०८३ दलघमी

सध्याची पाणी पातळी: ६०३.०० मीटर

उपयुक्त साठ्याची टक्केवारी: ६१.४८%

मे महिन्यातील एकूण आवक: २०.६१६ दलघमी

मे महिन्यातील पावसामुळे प्रकल्पाच्या साठ्यात २०.६१६ दलघमी पाण्याची भर पडली आहे. ही एकूण साठ्याच्या सुमारे २२% वाढ आहे. पुढील काळात पावसाळ्यातील जलसाठा अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल. - के. आर. येणगे, शाखा अभियंता, निम्न तेरणा प्रकल्प, माकणी

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam Water: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरणात वेळेआधी पाणी वाचा सविस्तर

Web Title: latest news Nimna Terna Project: Grace of water in May itself; Increase in storage of Nimna Terna Project Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.