Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होणार असून हलक्या ते मध्यम पावसाबरोबरच वादळी वारे आणि मेघगर्जना यांचा धोका आहे. (Marathwada Weather Update)
विशेषत: ४ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. (Marathwada Weather Update)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पावसाची सक्रियता वाढणार आहे. हलक्या ते मध्यम पावसाबरोबरच वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. (Marathwada Weather Update)
जिल्हानिहाय अंदाज
३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस.
२ ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
३ ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत पावसाची शक्यता वाढणार.
४ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वारा (ताशी ३० ते ४० किमी), मेघगर्जना व काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तापमानाचा कल
पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल.
त्यानंतर फारसा फरक राहणार नाही.
किमान तापमानातही पुढील चार ते पाच दिवसांत विशेष फरक होणार नाही.
३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, तर कमाल व किमान तापमान सरासरीएवढे ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतातील पिकांचे नियमित निरीक्षण करून कीड व रोगावर नियंत्रण ठेवावे.
* उघड्यावर काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा.
* वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिकांना आधार द्यावा.
* पिकांमध्ये पाणी साचणार नाही, यासाठी निचरा व्यवस्थेची काळजी घ्यावी.