Lokmat Agro >हवामान > Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलते; पुढील आठवड्यात हवामान कसे असेल? वाचा सविस्तर

Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलते; पुढील आठवड्यात हवामान कसे असेल? वाचा सविस्तर

latest news Marathwada Weather Update: Weather changes in Marathwada; What will the weather be like next week? Read in detail | Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलते; पुढील आठवड्यात हवामान कसे असेल? वाचा सविस्तर

Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलते; पुढील आठवड्यात हवामान कसे असेल? वाचा सविस्तर

Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यानचा हवामान अंदाज वाचा सविस्तर. (Marathwada Weather Update)

Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यानचा हवामान अंदाज वाचा सविस्तर. (Marathwada Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Marathwada Weather Update) 

यासोबतच तापमानात हळूहळू वाढ होणार असून, पाऊस तुरळक स्वरूपात राहील. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.(Marathwada Weather Update)

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील काही दिवसांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाऊस अपेक्षित नाही.(Marathwada Weather Update)

कोणत्या दिवशी, कुठे पाऊस?

३ आणि ५ ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.

४ ऑगस्ट रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

४ ऑगस्टपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात तूरळक ठिकाणीच पावसाच्या सरी बरसतील.

५ ऑगस्ट रोजी मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

तापमानात बदलाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४-५ दिवसांत कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे.

किमान तापमानात फारसा बदल होणार नाही; हीच स्थिती कायम राहील.

विस्तारित हवामान अंदाज – ०१ ते १४ ऑगस्ट

०७ ऑगस्टपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहील तर किमान तापमान हे सरासरीएवढे राहील.

०८ ते १४ ऑगस्टपर्यंत पाऊस हा सरासरीएवढा ते किंचित जास्त राहील तर कमाल आणि किमान तापमान दोन्ही सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहील.

शेतकऱ्यांना सल्ला 

* हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पेरणी झालेल्या पिकांवर पाण्याचे योग्य नियोजन करावे.

* वादळी वाऱ्याचा धोका लक्षात घेता उभ्या पिकांचे संरक्षण करावे.

* रासायनिक फवारण्या आणि खत व्यवस्थापन करावे.

* हवामान बदलांमुळे कीड व रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने वेळोवेळी पिकांची तपासणी करावी.

हे ही वाचा सविस्तर : Bamboo Cultivation : अनुदान भरपूर, लागवड थोडी; बांबू योजनेला प्रतिसाद का नाही? वाचा सविस्तर

Web Title: latest news Marathwada Weather Update: Weather changes in Marathwada; What will the weather be like next week? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.