Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Majalgaon Dam Water Level : माजलगाव धरणातील पाणी पातळी धोक्यात? शेतकऱ्यांची चिंता वाढली

Majalgaon Dam Water Level : माजलगाव धरणातील पाणी पातळी धोक्यात? शेतकऱ्यांची चिंता वाढली

latest news Majalgaon Dam Water Level: Is the water level in Majalgaon Dam in danger? Farmers' concerns have increased | Majalgaon Dam Water Level : माजलगाव धरणातील पाणी पातळी धोक्यात? शेतकऱ्यांची चिंता वाढली

Majalgaon Dam Water Level : माजलगाव धरणातील पाणी पातळी धोक्यात? शेतकऱ्यांची चिंता वाढली

Majalgaon Dam Water Level : उन्हाचा पारा चढताच माजलगाव धरणातील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. अवघ्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घटेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये पाणीटंचाईची भीती वाढू लागली आहे. (Majalgaon Dam Water Level)

Majalgaon Dam Water Level : उन्हाचा पारा चढताच माजलगाव धरणातील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. अवघ्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घटेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये पाणीटंचाईची भीती वाढू लागली आहे. (Majalgaon Dam Water Level)

माजलगाव : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा थेट परिणाम जलसाठ्यावर होत असून माजलगाव धरणातीलपाणी झपाट्याने कमी होत आहे. केवळ आठवडाभरात धरणाच्या पातळीत सुमारे २ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. (Majalgaon Dam Water Level)

एप्रिलमधील वाढलेल्या तापमानामुळे दररोज सुमारे ०.४ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे.(Majalgaon Dam Water Level)

बाष्पीभवनाचा वेग दुपटीने वाढला

मार्च महिन्यात बाष्पीभवनाचा दर तुलनेने कमी, म्हणजे सुमारे ०.२३ दलघमी होता. मात्र, एप्रिलच्या मध्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने हा दर जवळपास दुपटीने वाढला आहे.

७ एप्रिल : धरण ५८.१४% भरलेले

१५ एप्रिल : पातळी घसरून ५६.४१%

ही घसरण पुढील काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धरणाची सद्यस्थिती (महत्त्वाचे आकडे)

पाणीपातळी : ४२९.८५ मीटर

एकूण जलसाठा : ४३१.८० दलघमी

उपयुक्त साठा : १७६.०० दलघमी

भराव क्षमता : ५६.४१%

भूजल पातळीवर परिणाम; विहिरी-बोअर आटले

धरणातील पाणी घटल्याचा परिणाम परिसरातील भूजल पातळीवरही दिसून येत आहे.

विहिरी आणि बोअरवेल्सची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली

अनेक ठिकाणी पाणीस्रोत पूर्णपणे आटले

यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरल्याने शेतकरी दिलास्यात होते. मात्र, यंदा जलसाठा वेगाने कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यातच हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याने ही चिंता अधिकच गडद झाली आहे.

उन्हाळी आवर्तनाचे नियोजन सुरू

शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगामातील तीन पाळ्यांपैकी पहिले आवर्तन पूर्ण झाले आहे.

दुसरे आवर्तन : गुरुवारपासून सुरू

तिसरे आवर्तन : लवकरच देण्यात येणार

प्रशासनाचा इशारा

तहसीलदार संतोष रुईकर यांनी नागरिक आणि शेतकऱ्यांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काळात पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

माजलगाव धरणातील घटणारा जलसाठा आणि वाढते बाष्पीभवन यामुळे आगामी दिवसांत पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करत योग्य नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Godavari River Protection : कानसूरचा हट्ट ठरला गेमचेंजर; गावकऱ्यांच्या एकजुटीतून वाचली नदी, वाचा सविस्तर

अधिक वाचा : Manjara River Water Release : मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा

Web Title : माजलगाँव बांध का जल स्तर गिरा, बढ़ते तापमान के बीच किसान चिंतित।

Web Summary : बढ़ते तापमान और वाष्पीकरण के कारण माजलगाँव बांध का जल स्तर तेज़ी से घट रहा है। इससे पीने के पानी और सिंचाई को लेकर चिंताएँ बढ़ गई हैं, भूजल स्तर भी प्रभावित हुआ है। पिछले साल पूरी क्षमता के बावजूद जल की कमी से किसान चिंतित हैं।

Web Title : Majalgaon Dam's water level drops, farmers worry amid rising temperatures.

Web Summary : Majalgaon Dam's water level is rapidly decreasing due to rising temperatures and evaporation. This has led to concerns about drinking water and irrigation, with groundwater levels also affected. Farmers are worried as water scarcity looms despite last year's full capacity.