Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Manjara River Water Release : मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा

Manjara River Water Release : मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा

latest news Manjara River Water Release: Water circulation from Manjara Dam begins; 18 thousand hectares of crops will get relief | Manjara River Water Release : मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा

Manjara River Water Release : मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा

Manjara River Water Release : उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मांजरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. या आवर्तनामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना नवजीवन मिळणार आहे. (Manjara River Water Release)

Manjara River Water Release : उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मांजरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. या आवर्तनामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना नवजीवन मिळणार आहे. (Manjara River Water Release)

Manjara River Water Release : वाढत्या उन्हामुळे कोमेजण्याच्या मार्गावर असलेल्या उन्हाळी पिकांना दिलासा देण्यासाठी मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.(Manjara River Water Release)

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ११ एप्रिलपासून डाव्या व उजव्या कालव्यांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.(Manjara River Water Release)

पुढील १५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Manjara River Water Release)

१८ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ

या निर्णयामुळे बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, रेणापूर, लातूर आणि कळंब या पाच तालुक्यांतील सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऊस, भाजीपाला आणि इतर पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत होती, मात्र या आवर्तनामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.

पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार

या पाण्याच्या आवर्तनाचा फायदा केवळ शेतीपुरताच मर्यादित राहणार नाही. कालव्यालगतच्या ६३ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

धरणातील पाणीसाठा

सध्या मांजरा धरणात सुमारे ५९.८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा साठा महत्त्वाचा ठरत असून, योग्य नियोजनामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा ताण कमी होणार आहे.

शेतकऱ्यांत समाधान

एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानामुळे पिके धोक्यात आली होती. अशा परिस्थितीत वेळेवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

या आवर्तनामुळे उत्पादन वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.

मांजरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. योग्य वेळी घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो हेक्टरवरील पिके वाचण्यास मदत होणार असून, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Manjara River Water Release : मांजरा काठचा शेतकरी सुखावला; उसाला मिळणार मोठं 'जीवनदान' वाचा सविस्तर

अधिक वाचा : Jayakwadi Canal Water Release : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर; जायकवाडीमधून ४ आवर्तने; पाण्याची चिंता संपली?

Web Title : मंजरा बांध से पानी छोड़ा गया: 18,000 हेक्टेयर फसलों को राहत

Web Summary : मंजरा बांध से पानी छोड़े जाने से बीड, लातूर और धाराशिव जिलों में 18,000 हेक्टेयर फसलों को राहत मिली है। इस सिंचाई से गन्ना, सब्जियों और अन्य फसलों को जीवनदान मिलेगा, साथ ही 63 गांवों में पीने के पानी की समस्या भी दूर होगी।

Web Title : Manjara Dam Water Released: Relief for 18,000 Hectares of Crops

Web Summary : Water released from Manjara Dam provides relief to 18,000 hectares of crops across Beed, Latur, and Dharashiv districts. This irrigation will revitalize sugarcane, vegetables, and other crops, also addressing drinking water issues in 63 villages.