Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > राज्यातील 39 मोठी धरणे काठोकाठ भरली, 10 ऑक्टोबरपर्यंत कुठल्या धरणांत किती पाणी? 

राज्यातील 39 मोठी धरणे काठोकाठ भरली, 10 ऑक्टोबरपर्यंत कुठल्या धरणांत किती पाणी? 

Latest News Maharshtra dam storage 39 major dam 100 percent full see other dam water level on oct 10 | राज्यातील 39 मोठी धरणे काठोकाठ भरली, 10 ऑक्टोबरपर्यंत कुठल्या धरणांत किती पाणी? 

राज्यातील 39 मोठी धरणे काठोकाठ भरली, 10 ऑक्टोबरपर्यंत कुठल्या धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam Storage : यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरण काठोकाठ भरली आहेत. आज १० ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात..

Maharashtra Dam Storage : यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरण काठोकाठ भरली आहेत. आज १० ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage :    राज्यातून पावसाने माघार घेतल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून निवडक भाग वगळता सर्वदूर पाऊस थांबला आहे. यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरण काठोकाठ भरली आहेत. आज १० ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात..

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, केडगाव, वडज, डिंभे, घोड, पारगाव, सीना, खैरी, विसापूर ही धरणे १०० टक्के भरली. नाशिक जिल्ह्यातील दारणा, कडवा, करंजवण, गिरणा, हतनूर, वाघूर, मन्याड, उकई, पांझरा तर मुंबई उपनगरातील विहार, अप्पर वैतरणा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. 

तसेच पुणे विभागातील चासकमान, वीर, भाटघर, पवना या धरणासह मराठवाड्यासह नागपूर विभागातील उजनी, धोम, अलमट्टी, जायकवाडी, येलदरी, माजलगाव, तेरणा, मांजरा, तोतलाडोह, काटेपूर्णा, उर्ध्व वर्धा, अरुणावती ही धरणे काठोकाठ भरली आहेत. जवळपास ३९ मोठी धरणे संपूर्णतः भरली असून इतरही उर्वरित धरणांमध्ये ९८ टक्क्यांच्यावर पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा राज्यात मुबलक पाणीसाठा असल्याचे चित्र आहे. 

काही धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच

दरम्यान पाऊस जरी थांबला असला तरी काही धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच आहे यामध्ये जायकवाडी धरणातून ७ हजार ३३६ क्युसेक, विष्णुपुरी धरणातून २७ हजार ६१६ क्युसेक, सीना कोळेगाव धरणातून १० हजार ४०० क्युसेक, गंगाखेड परभणी धरणातून ५५ हजार ९७४ क्युसेक, नांदेड जुना पूल येथून २९ हजार २०५ क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. 

तसेच हातनुर धरणातून ६ हजार ९३० क्युसेक, गिरणा धरणातून ०३ हजार ४१४ क्युसेक, सारंगखेडा तापी येथून ८ हजार २९६ क्युसेक, सीना धरणातून २ हजार १६८ क्युसेक, राजापूर बंधारा धरणातून २८ हजार १११ क्युसेक, अलमट्टी धरणातून १ लाख ९८८ क्युसेक, गोसीखुर्द धरणातून २० हजार ३४१ क्युसेक, महागाव प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यातील धरणातून ०१ लाख १३ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे

- इंजि. हरिश्चंद्र.र.चकोर जलसंपदा (से.नि), संगमनेर.   

Web Title : महाराष्ट्र के बांध भरे: 10 अक्टूबर तक 39 प्रमुख जलाशय लबालब

Web Summary : महाराष्ट्र में भरपूर बारिश से बांध लबालब हैं। उनतालीस प्रमुख बांध पूरी तरह से भर चुके हैं, जबकि अन्य अपनी क्षमता के करीब हैं। बारिश कम होने के बावजूद, जायकवाड़ी और विष्णुपुरी सहित कुछ बांधों से पानी का निर्वहन जारी है, जिससे राज्य भर में पर्याप्त जल भंडारण सुनिश्चित है।

Web Title : Maharashtra Dams Full: 39 Major Reservoirs Overflowing as of October 10th

Web Summary : Maharashtra's dams are brimming due to ample rainfall. Thirty-nine major dams are full, with others nearing capacity. Discharge continues from some dams, including Jayakwadi and Vishnupuri, despite the rain's retreat, ensuring sufficient water storage across the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.