Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने आज (१३ सप्टेंबर) मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले असून, त्यातून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान स्थिती काय?
बंगालच्या उपसागरात ओडिशा–आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार होऊन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
ही प्रणाली उद्या जमिनीवर येण्याची शक्यता असून, त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.
कमी दाबाचा पट्टा पंजाबपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे.
मागील २४ तासांत नांदेडच्या किनवट येथे तब्बल ८० मिमी पाऊस, तर ब्रह्मपुरी व वर्धा येथे ३३ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
कोणत्या जिल्ह्यात अलर्ट
ऑरेंज अलर्ट (जोरदार पाऊस व वादळी वारे): लातूर, नांदेड
यलो अलर्ट (विजांसह हलका ते मध्यम पाऊस): सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा
मान्सूनचा परतीचा टप्पा सुरू असून राज्यातील अनेक भागांत पाऊस व वीजांचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पिकांचे संरक्षण करून नुकसान टाळावे, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतातील पाणी साचू देऊ नका; पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या.
* पावसाळी वातावरणात रासायनिक फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
* विजांच्या कडकडाटात शेतात काम टाळावे व सुरक्षित स्थळी थांबावे.