Join us

Maharashtra Weather Update : वादळी वारा, विजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; कुठे रेड, कुठे यलो अलर्ट? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:25 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत. मोसमी पावसाने जोर धरत १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत. मोसमी पावसाने जोर धरत १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाटांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)

राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जोर धरायला सुरुवात केली आहे. मोसमी पावसाचा जोर १८ जुलैलाही कायम राहणार आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचीही शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)

कोकणात मुसळधार, काही ठिकाणी रेड अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.

रायगड, पुणे येथे ऑरेंज अलर्ट, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर याठिकाणी यलो अलर्ट असून हलका ते मध्यम पाऊस होईल. आकाश ढगाळ राहील, तापमान २६ ते ३२ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान राहील.

पश्चिम महाराष्ट्रात यलो व ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर  या भागात जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट आहे.

विजांचा कडकडाट व ताशी ४०–५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मराठवाड्यात पाऊस जोरात

बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल.

छत्रपती संभाजीनगर, जालना येथे हलका ते मध्यम पाऊस होईल.

विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून यवतमाळ व अकोल्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस होईल.

उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर येथे हलका ते मध्यम पाऊस होईल.

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढील काही दिवसांत २० से.मी.हून अधिक पावसाची शक्यता आहे.

काय काळजी घ्यावी?

* नदी, नाले, पूरप्रवण भागात जाण्याचे टाळा.

* विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर थांबू नका.

* शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज पाहून शेतातील कामे आखावीत. 

* वादळी वाऱ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी झाडांच्या खाली थांबू नका.

शेतकऱ्यांना सल्ला 

* वादळी वारे व मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांची आडवी पडण्याची शक्यता आहे. उभ्या पिकांना काठ्या/आधार देऊन बांधून ठेवा.

* सोयाबीन, तूर, भात अशा पिकांमधील पाणी निचरा व्हावा यासाठी नांगरट/खाचा तयार करा.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Weather Update: मराठवाड्यात हवामान बदलले; 'या' जिल्ह्यात विजांचा गडगडाट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रपाऊसमराठवाडाविदर्भकोकण