Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने ब्रेक घेतला आहे. श्रावणात काही भागांमध्ये ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या सरी कोसळत आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील २४ तासांत हलक्या सरींची शक्यता असून, मुसळधार पावसाचा कोणताही इशारा सध्या देण्यात आलेला नाही.(Maharashtra Weather Update)
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात श्रावणाच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने थोडी विश्रांती घेतली असून काही जिल्ह्यांमध्ये हलक्याच श्रावण सरी बरसत आहेत, तर काही ठिकाणी उघडीप दिसून येत आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा कोणताही अलर्ट नाही. मात्र, आकाश ढगाळ आणि रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
पश्चिम महाराष्ट्रात ऊन-पावसाचा लपंडाव
पावसाचा जोर ओसरला असून हलक्याच सरी कोसळत आहेत.
पुणे जिल्हात मागील २४ तासात २.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तर आज हलक्याच सरी, ढगाळ वातावरण राहील.
सातारा जिल्हात मागील २४ तासात ७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून आज रिमझिम पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हात मागील २४ तासात ९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर आज दिवसभर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हात पावसाने विश्रांती घेतली असून आज ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता आहे.
सांगली जिल्हात २ मिमी पावसाची नोंद झाली असून आज ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता आहे.
विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* ढगाळ हवामानामुळे हरभरा, सोयाबीन यासारख्या पिकांवर परिणाम होऊ शकतो.
* पिकांवर बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी पाणी साचू देऊ नका.
* हवामान लक्षात घेऊन फवारणी, खत व्यवस्थापन नियोजन करा.