Join us

Maharashtra Weather Update : मान्सून परतीच्या वाटेवर; राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा चटका वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:25 IST

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा प्रभाव ओसरू लागला असून, तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये 'ऑक्टोबर हीट'चा चटका जाणवू लागला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा प्रभाव ओसरू लागला असून, तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये 'ऑक्टोबर हीट'चा चटका जाणवू लागला आहे. (Maharashtra Weather Update)

मान्सून परतताच तापमानात उसळी. अनेक शहरांत ३४ अंशांवर तापमान पोहोचल्याने नागरिकांना ऑक्टोबर महिन्याच्या उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस उन्हाचा कहर कायम राहील, असा अंदाज वर्तविला आहे.  गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण घटले असून, उष्णतेचा दाह नागरिकांना सोसवत नाही. (Maharashtra Weather Update)

मान्सून परतीच्या प्रवासात

यंदाच्या वर्षी साधारण मे महिन्यापासून मुक्काम करणारा मान्सून अखेर परतीच्या प्रवासाला निघाला आहे. 

राजस्थानमधून मान्सूनचे वारे साधारणतः १७ सप्टेंबर रोजी परततात; परंतु यंदा हा प्रवास १४ सप्टेंबरपासून सुरू झाला. मात्र, पुढे तो रेंगाळल्यामुळे राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास ५ दिवस उशिरा सुरू झाला.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघार घेईल.

कुठे अजून पावसाची शक्यता?

'शक्ती' चक्रीवादळ ओसरल्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणातील दक्षिणेकडील भागात, मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगळता उर्वरित राज्यात पावसाचे सावट नाही.

वाढत्या तापमानाने नागरिक हैराण

राज्यात सध्या तापमान वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी उकाड्याचा त्रास जाणवतोय.

चंद्रपूर – ३४.४°C

नागपूर – ३४.१°C

वर्धा – ३४.४°C

अशी नोंद झाली असून, दुपारच्या वेळी उष्म्याचा तीव्र दाह जाणवत आहे.

मुंबई व उपनगरांमध्येही पावसाचा प्रभाव संपल्याने उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, टोपी किंवा छत्रीचा वापर करणे आणि उन्हात बाहेर जाणे टाळणे अशा खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तरेकडून येतेय थंडीची चाहूल

मध्य भारत व महाराष्ट्रातून मान्सून परतताना उत्तर भारतात हिवाळ्याची चाहूल लागली आहे.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर येथे हिमवर्षावाची सुरुवात

दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश मध्ये तापमान घट

असे बदल दिसत आहेत. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत महाराष्ट्रातही थंडीची चाहूल लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मान्सूनच्या परतीने राज्यभरात 'ऑक्टोबर हीट'चा फटका बसू लागला आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतात वाढणारी थंडी लवकरच महाराष्ट्रातही जाणवेल, अशी हवामान विभागाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* दिवसाच्या उष्णतेमुळे जमिनीत ओल कमी होते. त्यामुळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सिंचन करा.

* जास्त उष्णतेत दुपारी पाणी देणं टाळा; त्यामुळे वाफ होऊन पाणी वाया जाते, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : हवामानात मोठा बदल: पावसाने घेतला ब्रेक; पण उकाडा पुन्हा वाढणार!

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Key Developments

Web Summary : Maharashtra's weather update brings the latest forecast. Stay informed about potential changes and key weather developments. Ensure preparedness for any impending weather conditions. Detailed reports and timely alerts are available for all regions.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रविदर्भकोकणमराठवाडा