Join us

Maharashtra Weather Update : 'या' जिल्ह्यात हलका पाऊस; मच्छीमारांना काय दिलाय इशारा वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:31 IST

Maharashtra Weather Update : नैऋत्य मान्सूनची ताकद गुजरात व कोकण-गोव्यात प्रकर्षाने जाणवली असून काही ठिकाणी मुसळधार सरींची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र मान्सून शांत आहे. याचदरम्यान अरबी समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharshtra Weather Update : नैऋत्य मान्सूनची ताकद गुजरात व कोकण-गोव्यात प्रकर्षाने जाणवली असून काही ठिकाणी मुसळधार सरींची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र मान्सून शांत आहे. याचदरम्यान अरबी समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहिती नुसार, नैऋत्य मान्सूनची क्रियाशीलता सध्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. गुजरात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली असून कोकण-गोव्यात मान्सून सक्रिय आहे.(Maharashtra Weather Update)

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र मान्सूनची स्थिती सामान्य असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.(Maharashtra Weather Update)

गुजरातमध्ये जोरदार पाऊस

सौराष्ट्र व कच्छ परिसरात काही ठिकाणी गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडला. गुजरात प्रदेशात बहुतेक ठिकाणी पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती

कोकण-गोवा: तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.

उत्तर कोकण व गुजरात प्रदेश: बहुतेक ठिकाणी गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दक्षिण कोकण, सौराष्ट्र व कच्छ: अनेक ठिकाणी पावसाची नोंद.

उत्तर मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस.

दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा: तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडला.

जोरदार वारे

मान्सूनसोबत जोरदार वारे वाहिल्याचीही नोंद झाली आहे.

कोकणात दापोली (रत्नागिरी) येथे ताशी ३७ किमी, कुलाबा येथे ३० किमी प्रतितास वेगाने वारे वाहिले.

मध्य महाराष्ट्रात कराड (सातारा) येथे ४४ किमी/ताशी, वल्होली (नाशिक) येथे ४३ किमी/ताशी वारे वाहिले.

मराठवाड्यात आंबेजोगाई (बीड) येथे ३३ किमी/ताशी वारे नोंदले गेले.

पुढील २४ तासांचा काय अंदाज

कोकण-गोवा येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

समुद्रात काय स्थिती?

ओमानच्या किनाऱ्यावर आणि नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागांत ताशी ४५ ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या किनाऱ्यालगतच्या भागांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांना इशारा

अरबी समुद्र आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे आणि खवळलेला समुद्र पाहता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* जोरदार वाऱ्यामुळे ऊस, केळी, सोयाबीन, मका यांसारख्या उंच पिकांना आधार द्यावा.

* मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक पाऊस असल्याने खते व औषध फवारणी योग्य हवामान पाहून करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात धो-धो सरी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसकोकणविदर्भमराठवाडामहाराष्ट्रगुजरात