Join us

Maharashtra Weather Update : घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांनी घ्यावी 'ही' महत्त्वाची काळजी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:46 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींचा जोर कायम असून रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी काय काळजी घ्यावी ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींचा जोर कायम असून रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.(Maharashtra Weather Update)

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत धुव्वांधार पाऊस कोसळत असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.(Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने पावसाची तीव्रता वाढली आहे. हा पट्टा दीव, सुरत, नंदुरबार, अमरावतीमार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला आहे.(Maharashtra Weather Update)

अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्यालगत चक्राकार वारे सक्रिय असून पुढील ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुसळधार पावसामुळे घरे, शेती, रस्ते व वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.(Maharashtra Weather Update)

नद्यांचा आणि धरणांचा धोका

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली.

राधानगरी धरणाचे ७ पैकी ५ दरवाजे बंद करण्यात आले.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कुठे कोणता अलर्ट जारी

रेड अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा

ऑरेंज अलर्ट : नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)च्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत ३.४ ते ४.४ मीटर उंच लाटा २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २.९ ते ४.० मीटर उंच लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्र खवळलेला असून ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* शेतात पाणी साचल्यास मुळे कुजतात, तात्काळ निचऱ्याची सोय करावी.

* ओलाव्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, शेतात फेरफटका मारून त्वरित उपाययोजना करावी.

* पाऊस थांबल्यावरच योग्य औषधांची फवारणी करावी.

* पशुधनासाठी कोरडा व सुरक्षित चारा साठवून ठेवावा.

* नुकसान झाल्यास महसूल व कृषी खात्याशी तातडीने संपर्क साधून पंचनाम्यात नावे नोंदवावीत व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.

मच्छीमारांसाठी सल्ला

* सर्व मासेमारी नौका, होड्या सुरक्षित ठिकाणी लावून ठेवाव्यात.

* दरवाजे, जाळी, दोरखंड नीट घट्ट बांधून ठेवावेत.

* समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : IMD अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसकोकणमराठवाडाविदर्भअमरावतीमच्छीमारशेतकरी