Join us

Maharashtra Weather Update : कुठे मुसळधार तर कुठे विजांच्या कडकडाटासह पाऊस; जाणून घ्या IMD रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 09:22 IST

Maharashtra Weather Update : यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट महिना अत्यंत निर्णायक ठरत आहे. या महिन्यात राज्यातील पावसाची स्थिती मिश्र स्वरूपाची दिसून आली. काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरले, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिकांना ताण सहन करावा लागला. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट महिना अत्यंत निर्णायक ठरत आहे. या महिन्यात राज्यातील पावसाची स्थिती मिश्र स्वरूपाची दिसून आली. (Maharashtra Weather Update)

काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरले, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिकांना ताण सहन करावा लागला.(Maharashtra Weather Update)

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज (२४ ऑगस्ट) रोजी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

विशेषतः कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असून, विदर्भ व मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.(Maharashtra Weather Update)

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काय परिस्थिती

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसोबत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई व ठाणे परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे.

रायगड जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नद्यांमध्ये पाणीपातळी वाढणे व शहरांमध्ये पाणी साचण्याचा धोका आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात काय परिस्थिती

विदर्भ : नागपूर, अमरावती, चंद्रपूर येथे पावसाची मध्यम तीव्रता राहील.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी व नांदेड येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. या भागातही यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पश्चिम व उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, जळगाव येथे हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील.

सांगली व सोलापूर जिल्ह्यांत मध्यम पाऊस पडेल.

पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन करावे. 

* पावसाच्या दिवसांत अनावश्यक कीटकनाशके न फवारता, पाऊस थांबल्यानंतरच योग्य औषधांचा वापर करणे फायदेशीर ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: IMD चा हवामान अंदाज : पुढील २४ तासांत राज्यात कुठे मुसळधार पाऊस? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडामुंबईपाऊस