Join us

Maharashtra Weather Update : गणेशोत्सवात राज्यभर पावसाचा धुमाकूळ; IMD चा अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 09:21 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. येत्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि वारे ताशी ४० किमी वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-जास्त होत असला, तरी वातावरणातील अचानक बदलांमुळे पावसाने नागरिकांचे हाल वाढवले आहेत.  (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा विरल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरणार असला तरी पुढील २४ तास हे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. (Maharashtra Weather Update)

पुढील २४ तासांचा अंदाज

कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यावरील भागात पावसाचा जोर वाढणार आहे.

वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी पर्यंत राहणार आहे.

उत्तर कोकणात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दक्षिण कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे.

हवामान विभागाने विशेष दक्षतेचा इशारा दिला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात पूरस्थिती

या पावसाचा सर्वात मोठा तडाखा मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे.

२६०० गावे अतिवृष्टीमुळे बाधित

नांदेडमध्ये १३२ मिमी रेकॉर्डब्रेक पाऊस

नांदेड शहरातील अनेक भाग जलमय

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती

मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असून, घाटमाथ्यावर पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत येत्या २४ तासांत ढगाळ वातावरण आणि तुरळक मुसळधार सरी बरसतील. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे.

पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहील, मात्र कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे.तरी काही भागात ढगाळ हवामान कायम राहील असेही हवामान विभागाने कळविले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* जोरदार वारे येण्याची शक्यता असल्याने पिकांना आधार द्यावा (उदा. झेंडू, ऊस, केळी).

* शेतातील विद्युत पंप, मोटारी व इतर यंत्रसामग्री सुरक्षित ठिकाणी ठेवावी.

* कीटकनाशक किंवा खते फवारणी मुसळधार पावसाच्या काळात टाळावी.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: आजचा दिवस पावसाचा; राज्यात २८ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा