Join us

Maharashtra Weather Update : जोरदार पावसाचा इशारा! तुमचा जिल्हा यलो अलर्टमध्ये आहे का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:27 IST

Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली असून आज (६ जून) रोजी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली असून आज (६ जून) रोजी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)

काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (६ जून) रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहील. दुपारी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पावसासह वाऱ्याचा वेगही अधिक राहिल असा अंदाज आहे.  

उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह बरसणार

नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात वीजेचा कडकडाट

छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार

नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* विजांच्या कडकडाटाच्या वेळी घरातच थांबा

* शेतीकामांसाठी योग्य नियोजन करा

* पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहा, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यांत यलो अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडापाऊस