Maharashtra Weather Update : मराठवाड्यात पावसाच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याच्या शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील ७२ तासांसाठी मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला असून, छत्रपती संभाजीनगरसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.आज ५ जुलैपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
मराठवाड्यातील हवामान
मराठवाड्यात आजपासून पावसाची हजेरी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
उर्वरित बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
६ जुलैपासून धाराशिव आणि लातूर वगळता उर्वरित ६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी आणि आवश्यक ती पेरणीसंबंधित कामे नियोजनबद्ध करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र
कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असून याठिकाणी यलो अलर्ट आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र व विदर्भ
नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि जळगावमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भात नागपूरसह अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया व यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.