Join us

Maharashtra Weather Update : कोकण-विदर्भात पावसाचा जोर; ३१ जुलैपर्यंत अलर्ट जारी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:12 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पाऊसाचा जोर असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, अमरावती, चंद्रपूर अशा १० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Heavy Rain)

Maharashtra Weather Update : राज्यात पाऊसाचा जोर असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, अमरावती, चंद्रपूर अशा १० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Heavy Rain)

तसेच, समुद्रात ४.२ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला असून, मासेमारीसाठी जाणाऱ्या लहान होड्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Heavy Rain)

महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचे व्यापक चित्र राहणार आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांत जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.(Heavy Rain)

कोणत्या भागांना यलो अलर्ट?

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, खालील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण

रायगड: पुढील दोन दिवस

रत्नागिरी: आज (२९ जुलै)

सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर: समुद्राच्या लाटा उंच होणार – ३१ जुलैपर्यंत समुद्रात जाण्यास मनाई

मुंबई, मुंबई उपनगर: लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

घाटमाथ्याचे भाग (सातारा, पुणे): २९ आणि ३० जुलै – अति पावसाचा इशारा

 विदर्भ

अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा: पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र 

कोल्हापूर, सातारा घाट भाग, पुणे : घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज

समुद्र किनाऱ्यांवर धोका: INCOIS इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्राने (INCOIS) दिलेल्या अलर्टनुसार आज (२९ जुलै)  रोजी संध्याकाळी ५:३० ते ३१ जुलै रात्री ८:३० वाजेपर्यंत ३.७ ते ४.२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सावधतेचा इशारा

लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये

असा आहे हवामानाचा अंदाज 

२९ जुलै (आज)

कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी जोरदार

मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस

विदर्भ/मराठवाडा: तुरळक ठिकाणी पाऊस

३० जुलै 

कोकण: जोरदार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र: तुरळक ठिकाणी

विदर्भ: अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

३१ जुलै

कोकण: बहुतेक ठिकाणी

मध्य महाराष्ट्र/मराठवाडा: तुरळक ठिकाणी

विदर्भ: काही भागांत पाऊस

१ ऑगस्ट

कोकण: बहुतांश ठिकाणी

मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी

विदर्भ/मराठवाडा: तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* शेतकऱ्यांनी पेरलेली पिकं योग्य रितीने निचऱ्याची व्यवस्था करावी.

* खत व्यवस्थापन व फवारणीसाठी हवामान लक्षात घेऊन नियोजन करावे

मच्छीमारांना महत्वाचा सल्ला

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र (INCOIS) आणि मुंबई वेधशाळेने २९ जुलै सायंकाळी ५:३० पासून ३१ जुलै रात्री ८:३० वाजेपर्यंत मोठ्या लाटांचा इशारा दिला आहे. या काळात लाटांची उंची ३.७ ते ४.२ मीटर दरम्यान असू शकते.

* कोकण किनारपट्टीवरील जिल्हे : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी समुद्र खवळलेला राहील.

* लहान बोटी/होड्या समुद्रात नेऊ नयेत : या काळात मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाणे टाळावे.

* मच्छीमार बंदरांवर सावधगिरी बाळगा : होड्यांना योग्यरीत्या बांधून ठेवा आणि समुद्रात हालचाल करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाचा सल्ला घ्या.

 * किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि पर्यटकांनीही समुद्रकिनारी जाणे टाळावे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : धो-धो पाऊस! पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रपाऊसकोकणविदर्भमराठवाडामोसमी पाऊस