Maharashtra Weather Update :पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा श्रावणसरींची हजेरी, तर पूर्व विदर्भात यलो अलर्ट जारी. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत विजांचा इशारा तर उर्वरित महाराष्ट्रात उघडिप राहील. सध्या ऊन – पावसाचा खेळ सुरु आहे.(Maharashtra Weather Update)
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात हवामानाने नवा रंग पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस पावसाचा जोर ओसरलेला असताना, आता पुन्हा श्रावणसरींनी दस्तक दिली आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची उघडीप हळूहळू संपत असून, काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Maharashtra Weather Update)
पुणे जिल्हात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान ढगाळ राहणार आहे. पुढील २४ तासांत हलक्या सरींची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
सातारा जिल्हात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. तर सांगली जिल्हात ढगाळ वातावरण, हलक्याशा सरी बरसतील. सोलापूर जिल्हात विजांचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र व कोकणात ढगाळ आकाश, कमी पावसाची शक्यता आहे तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातअधूनमधून हलक्याशा सरींसह ढगाळ हवामान राहील.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यात पावसाचा ब्रेक
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश राहील. काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे हलकासा पाऊस पडण्याची शक्यता.
पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जाहीर
पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जोरदार सरींसह वीजांचा इशारा दिला गेला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पावसाच्या विश्रांतीत खत फवारणी किंवा पाणी द्या.
* सोयाबीन, कापूस व तूर पिकात पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव तपासा. आवश्यकता असल्यास योग्य कीटकनाशकाची फवारणी करा, असा सल्ला देण्यात आला आहे.