Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा 'डबल अटॅक'; 'या' १६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, यलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:30 IST

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानाने अचानक आक्रमक रूप धारण केलं आहे. उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून तब्बल १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज तर काही भागात उकाड्याचा कहर नेमकी परिस्थिती काय, तुमचा जिल्हा यात आहे का? जाणून घ्या सविस्तर(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा आणि अचानक बदल होत असून नागरिकांना उष्णतेची तीव्र लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने २३ एप्रिल रोजी राज्यातील तब्बल १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.(Maharashtra Weather Update)

या बदलत्या परिस्थितीमुळे शेती, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)

कोकणात दमट उकाडा आणि पावसाची शक्यता

कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसह अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.

कमाल तापमान ३४ ते ३६°C दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान २५ ते २७°C च्या आसपास राहील. दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवेल. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट लागू आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

या भागात कमाल तापमान ३३ ते ३६°C तर किमान तापमान २२ ते २५°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात वाऱ्यासह पावसाचा इशारा

नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्यासोबत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ ते ३७°C पर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान २३ ते २६°C दरम्यान राहील. या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अलर्ट नसला तरी पावसाची शक्यता कायम

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.

या भागात तापमान ३३ ते ३५°C दरम्यान राहण्याची शक्यता असून हवामानात अचानक बदल होऊ शकतो.

विदर्भात उष्णतेचा कहर कायम

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. काही भागांत कमाल तापमान ३६ ते ३८°C पर्यंत पोहोचू शकते. उकाड्यामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असून विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

हवामान विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

* दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळा

* पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा

* विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या

शेतकऱ्यांसाठी सल्ला

अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट यामुळे पिकांना ताण येऊ शकतो.

विशेषतः काढणीच्या टप्प्यातील पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानानुसार नियोजन करणे गरजेचे आहे.

राज्यात सध्या हवामानाचा अस्थिर आणि दुहेरी प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha Heat Wave Update : अमरावती-वर्धा ‘हॉटस्पॉट’; ४५°C चा इशारा, उष्णतेचा कहर कधी थांबणार?

अधिक वाचा : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा; १६ जिल्ह्यांत यलो अलर्ट, गारपिटीची शक्यता

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather: Double Threat, Yellow Alert for 16 Districts

Web Summary : Maharashtra faces a double weather threat: heat waves and unseasonal rain. Sixteen districts are under a yellow alert, with potential for thunderstorms. Farmers and citizens should stay alert and follow weather advisories to mitigate impacts.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा