Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर अखेर ओसरला असून आता हवामानात बदल जाणवू लागले आहेत. (Maharashtra Weather Update)
विशेषतः कोकण किनारपट्टीवर सलग तीन दिवस धुवांधार पावसाने हजेरी लावली होती, पण आज (१०ऑक्टोबर) पासून पावसाने विश्रांती घेतली आहे.(Maharashtra Weather Update)
दिवाळीपूर्वी थंडीची चाहूल
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता अत्यल्प आहे. मान्सूनचा शेवटचा टप्पा ओसरत असून, दिवाळीपूर्वी हवामान उबदार आणि दमट राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि सौम्य उकाडा असा माहोल राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोकणात स्थिर हवामान
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा जोर होता.
मात्र, आज हवामान खात्याने कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. सर्वत्र आंशिक ढगाळ पण स्थिर हवामान पाहायला मिळत आहे.
किनाऱ्यावर शांतता
राज्यातील तीनही किनारपट्टी भागांत गेल्या काही दिवसांत हलका ते मध्यम पाऊस झाला होता. मात्र, आता हवामान सुखद आणि स्थिर आहे.
समुद्रकिनाऱ्यावर सौम्य वारे वाहतील
काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता
दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा राहील
शेतकऱ्यांना सल्ला
* महाराष्ट्रात पावसाला विराम मिळाल्याने शेतातील आर्द्रता कमी होण्याची शक्यता आहे.
* त्यामुळे सोयाबीन, भात आणि भाजीपाला पिकांमध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.