Maharashtra Dam Water Storage : फेब्रुवारी महिना अर्ध्यावर येताच राज्यात तापमान वाढू लागले आहे.उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. (Maharashtra Dam Water Storage)
अशा परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील धरणसाठा समाधानकारक असल्याचे चित्र समोर आले आहे.(Maharashtra Dam Water Storage)
राज्यातील एकूण २,९९७ धरणांमध्ये सध्या ७१.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत हा साठा ६३.८९ टक्के इतका होता. म्हणजेच यंदा तब्बल ७ टक्क्यांनी अधिक पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Maharashtra Dam Water Storage)
विभागनिहाय जलसाठा स्थिती
राज्यातील विविध विभागांमध्ये जलसाठ्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
नाशिक विभाग – ७३.९४ %
अमरावती विभाग – ७३.५६ %
छत्रपती संभाजीनगर विभाग – ७३.३८ %
पुणे विभाग – ७०.२२ %
नागपूर विभाग – ७०.१३ %
कोकण विभाग – ६५.५० %
नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात साठा ७३ टक्क्यांपेक्षा अधिक असून ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
मात्र, कोकण विभागात तुलनेने कमी म्हणजे ६५.५० टक्के साठा असल्याने त्या भागात नियोजनबद्ध पाणी वापराची गरज अधोरेखित होत आहे.
साठ्याची एकूण क्षमता आणि शिल्लक पाणी
राज्यातील धरणांची एकूण उपयुक्त साठा क्षमता ४०,५३५.८४ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) इतकी आहे. सध्या प्रत्यक्षात २८,८६१.९८ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढतो. परिणामी उपलब्ध पाण्यात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि औद्योगिक वापर यामध्ये संतुलन राखणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पाणी नियोजनाचे आव्हान
जरी साठा समाधानकारक असला तरी उन्हाळ्याचे तीन ते चार महिने अजून बाकी आहेत. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, टँकर व्यवस्थापन, शेतीसाठी नियोजित पाणी वाटप आणि जलसंवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे.
सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील पाणीसाठा दिलासादायक असला तरी काटेकोर नियोजन आणि जबाबदारीने वापर केल्यासच उन्हाळा सुरळीत पार पडू शकतो, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.
