Join us

Krishna Marathwada Project : मराठवाड्यात सिंचनाचा नवा आरंभ; कृष्णेचे पाणी लवकरच शिवारात पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:36 IST

Krishna Marathwada Project : मराठवाड्याच्या हरितक्रांतीसाठी महत्त्वाचा ठरणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. ९० टक्के काम पूर्ण, आणि लवकरच ७ टीएमसी (TMC) पाणी २६ हजार हेक्टर शेतीला जीवनदायी ठरणार आहे. (Krishna Marathwada Project)

Krishna Marathwada Project :  मराठवाड्याच्या हरितक्रांतीसाठी महत्त्वाचा ठरणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. ९० टक्के काम पूर्ण, आणि लवकरच ७ टीएमसी (TMC) पाणी २६ हजार हेक्टर शेतीला जीवनदायी ठरणार आहे.   (Krishna Marathwada Project)

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांचे आश्वासन शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच ७ टीएमसी पाणी या भागात पोहोचणार आहे.   (Krishna Marathwada Project)

या पाण्यामुळे २६ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सोमवारी दिली.  (Krishna Marathwada Project)

सोमवारी विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी, दारफळ येथील पंपगृह तसेच तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील उपसा सिंचन पंपगृह पाहणी केली. यावेळी त्यांनी रामदरा तलाव आणि परिसरातील इतर सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.  (Krishna Marathwada Project)

२३ टीएमसी पाण्याचे लक्ष्य

पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाणी आणल्यानंतर एकूण २३ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचा शासनाचा मानस आहे. “किरकोळ कामे शिल्लक आहेत, ती लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करणार आहोत,” असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या काळात प्रकल्पाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या योजनेला गती मिळाली. अप्रतिम काम झाले असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल, असे ते म्हणाले.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहाखातर मी स्वतः पाहणीसाठी आलो. आ. पाटील यांनी यावेळी रामदरा तलावाजवळील देवीचे १०८ फुटी शिल्प, रोप-वे, २२ एकरांवरील बगिचा, भक्त निवास याबाबत माहिती दिली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, गुलचंद व्यवहारे, बाबा घोंगते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam : जायकवाडी साठवण क्षमतेत मोठी घट; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रनदीधरणपाणीमराठवाडाशेतकरीशेतीपाटबंधारे प्रकल्प