Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि वरच्या भागात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. (Jayakwadi Dam Water)
परिणामी, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता धरणाचे १० दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्गही कमी करण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Water)
धरणाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जायकवाडीच्या ८ दरवाज्यांमधून ४ हजार १९२ क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे.(Jayakwadi Dam Water)
गुरुवारपासून सुरू असलेला विसर्ग शनिवारी झाला मर्यादित
गुरुवारी (१ ऑगस्ट) रोजी धरण २० टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने जलपूजन करून १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांनंतर शनिवारी धरणात येणारी पाण्याची आवक केवळ ३,०६६ क्युसेक इतकी राहिल्यामुळे विसर्गातही घट करण्यात आली.(Jayakwadi Dam Water)
धरणाचे क्रमांक ११, १२, १३, १५, १७, २०, २२, २४, २५, आणि २६ हे १० दरवाजे बंद करून, विसर्ग ५ हजार २४० क्युसेकने कमी करण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Water)
जायकवाडी धरणाची सद्यस्थिती
घटक | माहिती |
---|---|
एकूण जलसाठा | २,७१७.९११ दलघमी |
जिवंत साठा | १,९७६.८०५ दलघमी |
सध्याची पाण्याची आवक | ३,०६६ क्युसेक |
सध्या नदीपात्रात विसर्ग | ४,१९२ क्युसेक |
धरण १००% भरले किती वेळा | १५ वेळा |
एकूण १७ वेळा धरण भरले | पूर्ण क्षमतेने (इतिहासात) |
आगामी स्थिती काय?
सध्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्याने, धरणातील पाण्याची वाढही मर्यादित झाली आहे. पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढल्यास, पुन्हा विसर्गात वाढ केली जाऊ शकते.
धरण परिसरातील नागरिकांनी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.