Isapur Dam Water Release : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणातीलपाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विसर्गात घट करण्यात आली आहे. जयपूर बंधाऱ्यातून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकात घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.(Isapur Dam Water Release)
२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणावरील पाच गेट प्रत्येकी ०.३० मीटरवरून कमी करून ०.१० मीटर इतके उघडण्यात आले. यामुळे सध्या इसापूर धरणाच्या सांडव्यावरील गेटद्वारे एकूण १७२५ क्युसेक (४८.८३५ क्युमेक) इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे.(Isapur Dam Water Release)
धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार पुढील विसर्गात वाढ अथवा घट करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.(Isapur Dam Water Release)
नागरिकांनी घ्यावी खबरदारी
पूरनियंत्रण कक्षाने नदीकाठावरील तसेच पूरग्रस्त होऊ शकणाऱ्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पैनगंगा नदीकाठावरील रहिवाशांनी अनावश्यकपणे नदीपात्रात न जाण्याचे आणि जनावरांना देखील नदीपात्रात न सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला असला तरी सध्या आवक कमी झाल्याने विसर्ग नियंत्रित करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. प्रशासनाकडून धरण परिसर व नदीकाठावरील गावांवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार आहेत.