Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : गुरुपौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसात 'या' सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता! 

Maharashtra Rain : गुरुपौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसात 'या' सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता! 

Latest News Heavy rain likely in six districts in five days leading up to Guru Purnima | Maharashtra Rain : गुरुपौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसात 'या' सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता! 

Maharashtra Rain : गुरुपौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसात 'या' सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता! 

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै गुरु पौर्णिमेपर्यंत कुठे कुठे पाऊस असेल?

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै गुरु पौर्णिमेपर्यंत कुठे कुठे पाऊस असेल?

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलैपर्यंत नंदुरबार तसेच मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील १९ जिल्ह्यांत आणि जळगांव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता (Heavy rain) आहे. 

या सहा जिल्ह्यातील शिरपूर, सिंदखेडा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एदलाबाद, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड व लगतच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
               
त्यामुळे घाटावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी दारणा गिरणा वैतरणा कश्यपी कडवा प्रवरा,भीमा नीरा इंद्रायणी मुळा मुठा कुकडी कृष्णा-कोयना, पंचगंगा वारणा दूधगंगा भोगावती ह्या नद्या पूर-पाण्यासह दुथडी वाहु शकतात.
               
संपूर्ण मराठवाड्यातील ८ आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच जळगांव धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यातील  वर्षच्छायेच्या प्रदेशातील उर्वरित तालुक्यात आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार दि. ८ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता जाणवते. 

तर त्यापुढील २ दिवस म्हणजे बुधवार व गुरुवारी ९ व १० जुलै ला या भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार दि. ११ जुलैपासुन काहीशी उघडीप, काहीशी रिमझिम, तर मधूनच सूर्यदर्शन अशा वातावरणाची शक्यता जाणवते. 

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune. 

Web Title: Latest News Heavy rain likely in six districts in five days leading up to Guru Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.