Lokmat Agro >हवामान > Nashik Dam Storage : दोन दिवस मुसळधार, नाशिक जिल्ह्यांत 11 धरणे हाऊसफुल, वाचा संपूर्ण पाणीसाठा 

Nashik Dam Storage : दोन दिवस मुसळधार, नाशिक जिल्ह्यांत 11 धरणे हाऊसफुल, वाचा संपूर्ण पाणीसाठा 

Latest News Gangapur dam Heavy rains for two days, 11 dams housefull in Nashik district, read complete water storage | Nashik Dam Storage : दोन दिवस मुसळधार, नाशिक जिल्ह्यांत 11 धरणे हाऊसफुल, वाचा संपूर्ण पाणीसाठा 

Nashik Dam Storage : दोन दिवस मुसळधार, नाशिक जिल्ह्यांत 11 धरणे हाऊसफुल, वाचा संपूर्ण पाणीसाठा 

Nashik Dam Storage : दोन दिवसात झालेल्या पावसामुळे धरणे (Nashik Dam Storage) हाऊसफुल्ल झाली आहेत. 

Nashik Dam Storage : दोन दिवसात झालेल्या पावसामुळे धरणे (Nashik Dam Storage) हाऊसफुल्ल झाली आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : जून महिन्यापासून नाशिककरांवर कृपा करणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात ओढ दिली असतानाच दोन दिवसात झालेल्या पावसामुळे धरणे (Nashik Dam Storage) हाऊसफुल्ल झाली आहेत. 

जून आणि जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या निम्म्या पावसाची नोंद झाली आहे. जवळपास १६ धरणे काठोकाठ भरली असून भावली, वालदेवी, कश्यपी, आळंदी, वाघाड, तिसगाव, नांदुरमधमेश्वर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज ही अकरा धरणे १०० टक्के भरली आहेत.

असा आहे पाणीसाठा 
गंगापूर धरण ९३.६२ टक्के, कश्यपी धरण ९७.०३ टक्के, गौतमी गोदावरी धरण ९६.६८ टक्के, आळंदी धरण ९५.३२ टक्के, पालखेड धरण ८२.७० टक्के, करंजवण धरण ९३.२० टक्के, पुणे गाव धरण ८८.९२ टक्के, दारणा धरण ९४.६१ टक्के, मुकणे धरण ९८.०४ टक्के, कडवा धरण ८८.८० टक्के भरले आहे.

वाकी धरण ९४.२२ टक्के, भोजापुर धरण ९७.५१ टक्के, चनकापूर धरण ७६.४३ टक्के, गिरणा धरण ७१.०३ टक्के तर पुनद धरण ६९.१७ टक्के असा एकूण नाशिक जिल्ह्यातील २६ प्रकल्पातील साठा हा ८७.७१ टक्के इतका आहे.

जयकावडीकडे गेले भरपूर पाणी 

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावे पाण्याखाली गेली आहेत. नांदुरमधमेश्वर प्रकल्पातून जायकवाडीकडे १ जूनपासून आतापर्यंत ४ लाख ८८ हजार ४१७ क्यूसेक वेगाने ४२ हजार २१४ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे.

Web Title: Latest News Gangapur dam Heavy rains for two days, 11 dams housefull in Nashik district, read complete water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.