Monsoon Update : गेल्या पंधरा दिवसापासून एकाच जागेवर खिळलेल्या मान्सून ने आज परतीच्या प्रवासास सुरवात करून महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. त्याची आजची सीमा रेषा कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व विदर्भातील अकोला तसेच इतर राज्यातील जबलपूर, वाराणसी शहरातून जात आहे.
दरवर्षी ५ ऑक्टोबरला खान्देशात प्रवेशणारा परतीचा मान्सून, या वर्षी १० ऑक्टोबर ला प्रवेशला असुन येत्या ३-४ दिवसादरम्यान तो महाराष्ट्राबाहेर पडण्याची वातावरणीय शक्यता असुन देशातून त्याच्या सरासरी १५ ऑक्टोबरला बाहेर पडण्याची शक्यताही जाणवते.
या वर्षी १५ ऑक्टोबरला जर मान्सून परतला तर मग येणाऱ्या रब्बी हंगामावर त्याचा काय परिणाम जाणवेल?
मान्सून वेळेत परतल्यामुळेच रब्बी हंगामाच्या पुढील सहा महिन्यासाठी निसर्गत : परंपरेने आतापर्यन्त चालत आलेल्या वातावरणीय घटना, म्हणजे थंडी, बं.उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे, सरासरी वारंवारेते प्रमाणे हंगामात तयार होणाऱ्या त्या चक्रीवादळांची संख्या, २६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत होणारी पण कमी प्रमाणातील गारपीट,
हे चित्र पहा..
तसेच माफक असे धुक्याचे प्रमाण, थंडीत पडणारे भू-दवीकरण पण कमी प्रमाणात होणारे कमी बादड, प्रमाणातच पडणारे भू-स्फटिकिकरण( हिवाळ्यात बर्फचा चुरा पडणे), शिवाय वेळेतच पुन्हा ईशान्य मान्सूनचे निर्गमन होणे इत्यादि वातावरणीय घटना पार मार्च - एप्रिलपर्यंत सुयोग्य असे वातावरणीय बदल शेतीसाठी घडवुन आणतील, असे वाटते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune