Maharashtra Dam Storage : राज्यातील मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. तर धरणांचीपाणी पातळी झपाटयाने वाढली आहे. आज २२ सप्टेंबरपर्यंत धरणांचापाणीसाठा किती आहे, कोणती धरणे १०० टक्के भरली आहेत, ते पाहुयात....
आज जवळपास २९ धरणे १०० टक्के भरली असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक धरणांचा समावेश आहे. भंडारदर, निळवंडे, आढळा, येडगाव, डिंभे, मां.ओहोळ, घा.पारगाव, सीना, खैरी, विसापुर आदी धरणांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील दारणा, करंजवण, गिरणा, मन्याड, पांझरा, मुंबईतील मो.सागर, विहार, तुलसी, कोकणातील बारावे, मोराबे, पुणे विभागातील भाटघर, चासकमान, पानशेत, वीर, पवना, तर मराठवाड्यातील धोम, तेरणा, उजनी, मांजरा, सीनाकोळे ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
तर दुसरीकडे गंगापुर ९८.५६ टक्के, जायकवाडी धरण ९९.६७ टक्के, पालखेड ९६.४८ टक्के, हतनुर ७१.५७ टक्के, भोजापुर ९२.५२ टक्के, ऊकई ९६.२२ टक्के, म.वैता ९९.१३ टक्के, अ.वैतरणा ९९.७४ टक्के, हेटवणे ९८.३४ टक्के, खडकवासला ९८.४१ टक्के, अलमट्टी ९९.६० टक्के, गोसीखुर्द ६३.७२ टक्के भरले आहे.
धरणांचा विसर्ग
- जायकवाडी (गोदावरी) विसर्ग - २४१०४/वाढ --६६९२४
- अलमट्टी धरण - ८९ हजार ९८३ क्युसेक
- राजापुरबंधारा(कृष्णा)- ३६ हजार २५० क्युसेक
- उजनी (धरण) - ७१ हजार ६०० क्युसेक
- पंढरपूर - ३३ हजार ९६२ क्युसेक
- सारंगखेडा (तापी) - ३४ हजार ६४३ क्युसेक
- मांजरा- १८ हजार ७४५ क्युसेक
- तेरणा - २० हजार ४१६ क्युसेक
- विष्णुपुरी - ५७ हजार ३२२ क्युसेक
- सीनाकोळेगाव - ३२ हजार ३०० क्युसेक
- इंजि. हरिश्चंद्र .र. चकोर जलसंपदा (से.नि.), संगमनेर.