Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Buldhana Sinchan Prakalpa : सिंचन आहे पण वापर नाही; शेतकऱ्यांना फायदा का होत नाही?

Buldhana Sinchan Prakalpa : सिंचन आहे पण वापर नाही; शेतकऱ्यांना फायदा का होत नाही?

latest news Buldhana Sinchan Prakalpa: There is irrigation but no use; Why are farmers not benefiting? | Buldhana Sinchan Prakalpa : सिंचन आहे पण वापर नाही; शेतकऱ्यांना फायदा का होत नाही?

Buldhana Sinchan Prakalpa : सिंचन आहे पण वापर नाही; शेतकऱ्यांना फायदा का होत नाही?

Buldhana Sinchan Prakalpa : बुलढाणा जिल्ह्यात सिंचनाची क्षमता मोठी असतानाही प्रत्यक्ष वापर मर्यादित राहिल्याने शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. यामुळे उत्पादन, उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून, विकासाला अडथळे निर्माण होत आहेत.(Buldhana Sinchan Prakalpa)

Buldhana Sinchan Prakalpa : बुलढाणा जिल्ह्यात सिंचनाची क्षमता मोठी असतानाही प्रत्यक्ष वापर मर्यादित राहिल्याने शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. यामुळे उत्पादन, उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून, विकासाला अडथळे निर्माण होत आहेत.(Buldhana Sinchan Prakalpa)

बुलढाणा : जिल्ह्यातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने गती द्यायची असेल, तर सिंचन विस्तार हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे जिल्हा धोरणात्मक आराखड्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.(Buldhana Sinchan Prakalpa)

सध्या 'नकाशात प्रकल्प, शेतात दुष्काळ' अशी परिस्थिती असून, कागदोपत्री सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.(Buldhana Sinchan Prakalpa)

क्षमता आहे, पण वापर मर्यादित

जिल्ह्यात पाटबंधारे, मृदा व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद योजना तसेच वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प विचारात घेतल्यास सिंचनाची संभाव्य क्षमता सुमारे २.८ ते ३ लाख हेक्टरपर्यंत आहे.

मात्र, प्रत्यक्षात निर्माण झालेली क्षमता केवळ १.७ ते १.९ लाख हेक्टर इतकीच आहे. त्यापैकी प्रत्यक्ष वापर सुमारे १.२ ते १.४ लाख हेक्टर क्षेत्रापुरताच मर्यादित आहे.

या तफावतीमुळे जिल्ह्यातील बहुतांश शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. परिणामी, एकपिकी शेतीचे वर्चस्व कायम राहून उत्पादनात अनिश्चितता निर्माण होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य डळमळीत राहते.

सिंचन वाढल्यास होणार सकारात्मक बदल

सिंचनाचा विस्तार झाल्यास जिल्ह्यात शेतीचा चेहरामोहरा बदलू शकतो. दुहेरी हंगाम घेणे शक्य होईल, भाजीपाला आणि फळबागांचे क्षेत्र वाढेल, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुधारेल आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.

उपाययोजनांचा रोडमॅप स्पष्ट

जिल्ह्यासाठी सिंचन वाढविण्याचा स्पष्ट रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

* प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देणे

* ठिबक व तुषार (सूक्ष्म सिंचन) पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर विस्तार

* उपलब्ध पाण्याचे शास्त्रीय व कार्यक्षम व्यवस्थापन

* शेतपातळीवरील लहान-मोठ्या जलसंधारण उपाययोजना राबविणे

नदीजोड प्रकल्पाकडून अपेक्षा

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास अनेक कोरडवाहू भागांना पाण्याचा दिलासा मिळू शकतो.

वेळेत अंमलबजावणीची गरज

तथापि, केवळ योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्यांची वेळेत अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे.

प्रकल्प रखडल्यास कागदावरची सिंचन क्षमता वाढत राहील, पण प्रत्यक्षात शेतकरी मात्र दुष्काळाशीच सामना करत राहील.

बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सिंचनाचा विस्तार ही काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारेच 'नकाशात प्रकल्प, शेतात दुष्काळ' या स्थितीतून बाहेर पडता येईल, असे चित्र स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Buldhana Sinchan Prakalpa : कोटींचा पूर, पण बांधावर कोरडेपणा; शेतकऱ्याच्या वाट्याला अजूनही प्रतीक्षा!

अधिक वाचा : Buldhana Sinchan Prakalpa : नकाशात प्रकल्प, शेतात दुष्काळ; बुलढाण्याचं धक्कादायक वास्तव

Web Title : बुलढाणा सिंचाई परियोजना: सिंचाई है पर उपयोग नहीं; किसानों को फायदा क्यों नहीं?

Web Summary : बुलढाणा में सिंचाई की क्षमता का उपयोग नहीं हो रहा, जिससे कृषि विकास बाधित है। क्षमता होने के बावजूद, वास्तविक उपयोग कम है, जिससे किसान बारिश पर निर्भर हैं। सिंचाई का विस्तार कृषि को बदल सकता है, दोहरी फसल को सक्षम कर सकता है और ग्रामीण रोजगार को बढ़ावा दे सकता है। परियोजनाओं का समय पर कार्यान्वयन महत्वपूर्ण है।

Web Title : Buldhana Irrigation: Irrigation exists, but unused; Why farmers don't benefit?

Web Summary : Buldhana's irrigation potential is underutilized, hindering agricultural progress. Despite potential, actual usage lags, leaving farmers dependent on rain. Expanding irrigation can transform agriculture, enabling double cropping, and boosting rural employment. Timely implementation of projects is crucial for progress.